वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत मधील अखंड हरिनाम सप्ताहात हभप अर्जुन महाराज मोटे यांच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सुरूवात

0
271
जामखेड प्रतिनिधी
             जामखेड न्युज——
हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात उद्या दिनांक १२ रोजी हभप अर्जुन महाराज मोटे यांच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सुरूवात झाली 
 यांनी पुढीलप्रमाणे अभंग निरूपणासाठी घेतला होता. 
सत्य साच खरे । नाम विठोबाचे बरे ॥
येणे तुटती बंधने । उभयलोकी कीर्ती जेणे ॥
भाव ज्याचे गाठी । त्यासी लाभ उठाउठी ॥
तुका म्हणे भोळा । जिंकू जाणे कळीकाळा ॥
तुकाराम महाराज म्हणतात की या संपूर्ण संसारात एकच सत्य खरे असून, साच असून ते आहे श्री हरि विठ्ठलाचे नाम, जे घेतल्याने मग मनुष्याचे येथील भावबंध तुटतात, मायेपासून त्याची सुटका होते आणि अंती त्याचा उद्धार होतो. ते म्हणतात एवढेच नव्हे तर विठ्ठलाचे नाम गायल्याने त्याची उभयालोकांत, म्हणजेच ह्या तिन्ही लोकांत कीर्ती देखील होते. परंतु त्यासाठी ठायी भाव मात्र
शुद्ध हवा, म्हणजेच ते म्हणतात ज्या कोणाच्या ठायी येथे श्री हरिविषयी शुद्ध भाव असतो त्यास हा लाभ उठाउठी किंवा तात्काळ लाभतो. त्याला त्याची प्रचिती हातोहात येते. तुकोबाराय शेवटी म्हणतात की अशारितीने नामस्मरण करणारा जरी कितीही भोळा असला तरीही त्याचा भाव मात्र उच्चप्रतीचा असल्याने तो काळाला देखील जिंकू शकतो, त्याला काळाला जिंकण्याचे तंत्र चांगलेच अवगत असते.
  कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती कीर्तनासाठी हभप उत्तम महाराज वराट, हभप कैलास महाराज भोरे, हभप हरीभाऊ काळे, उत्तरेश्वर वराट, बाजीराव वराट, अशोक अडसूळ यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
       सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे. 
आज गुरूवार दि. १३ रोजी  ह. भ. प. दत्ता महाराज आंबीरटकर डिकसळ
शुक्रवार  दि. १४ रोजी न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे वाघदरा बीड
शनिवार दि. १५ रोजी महेश महाराज माकणीकर लोहारा
रविवार दि. १६ रोजी ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे आळंदी
सोमवार दि. १७ रोजी संजयजी महाराज देशमुख
मंगळवार दि. १८ रोजी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे
तसेच मंगळावर १८ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन तसेच
बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल. 
      तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here