जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयात नॅशनल डिजिटल लायब्ररी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
ग्रंथालय हा महाविद्यालयाचा कणा आहे- प्रा. बजगुडे
बदल ही काळाची गरज आहे. पारिस्थिती मध्ये सुधारणा घडवायच्या असतील तर नवनवीन गोष्टी आत्मसात करून बदल घडवावा लागेल, मोठ्या मोठ्या लायब्ररी ह्या आता या बदलामुळे आपण खिशात घेऊन फिरू शकतो, व त्याचा विविध शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी उपयोग करता येऊ शकतो.

जामखेड महाविद्यालयातील IQAC आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने नॅशनल डिजिटल लायब्ररी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते या वेळी प्रा.बजगुडे बोलत होते, ग्रंथालय हा महाविद्यालयाचा कणा असतो.आता ग्रंथालयातील विविध पुस्तके हे आपल्या मोबाईलवर सहज रीत्या नॅशनल डिजिटल लायब्ररी च्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. तसेच विविध विषयांचे व्याख्याने यांवर उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग विध्यार्थ्यांच्या जीवनात विविध टप्यावर होत आहे. पारंपरिक लायब्ररी तितकीच महत्वाची आहे. प्राचार्य डॉ. डोंगरे एम एल यांनी कार्यक्रमाचे महत्त्व समजाऊन सांगताना सांगितले, की प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल झपाट्याने होत आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात पारंपरिक लायब्ररी इतकेच डिजीटल लायब्ररी सुध्दा खुप महत्वाचे आहे.सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेणे गरजेचे आहे.

महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. माने सर यांनी विद्यार्थ्यांनी N – List च्या आधारावर विविध जर्नल ची माहिती मिळवून विविध क्षेत्रातील संशोधन करणे गरजेचे आहे हे समजावून सांगितले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डोंगरे एम एल, उपप्राचार्य डॉ नरके एस वाय, IQAC प्रमुख डॉ सरवदे व्हि. डी., सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते





