ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पाठ सोडेना!!! सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची झाली दैना, सोयाबीन काढून देईना

0
230

 

जामखेड न्युज——

ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पाठ सोडेना!!!
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची झाली दैना, सोयाबीन काढून देईना

 

 

गणपती गेले, मागोमाग नवरात्र सरली, दसरा झाला आणि आता दिवाळी ऐन ८ दिवसांवर आली आहे मात्र अजूनही पावसाळा संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.

सहसा जून ते सप्टेंबर या कालावधीला पावसाळा म्हणतात हे आपण सगळेच शाळेत शिकलो आहोत पण मागील काही वर्षांपासून सप्टेंबर सोडाच पण पार जानेवारी पर्यंतही पाऊस टिकून असतो.

पाऊस न पडणाऱ्या परिस्थितीला अनेकजण पर्यावरणाची हानी, वृक्षतोड अशी कारणे जोडतात पण जर पाऊस अधिक पडत असेल तर दोष कोणाचा?

निसर्गाच्या या प्रक्रियेत नेमकं आपलं काही चुकतंय का? आताही ऑक्टोबर महिना सुरु आहे. महाराष्ट्राच्या गावोगावीच नव्हे तर मुंबई, पुणे अशा मुख्य शहरांमध्येही अजून पावसाचा जोर काही ओसरलेला नाही.

सोयबीन पाण्यात काढलेल्या मुठी पाण्यात आणि सोयाबीन काढुन लावलेल्या बुचाडाभोवती तळे अशा पद्धतीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दैना अतिवृष्टीने झाली आहे. गुडघाभर चिखलात एक एक सोयाबीनचा ठोंब गोळा करून डोक्यावर वाहत कसेबसे बुचाड लावले तर दररोजच होत असलेल्या पावसामुळे बुचाडाभोवती तळे झालेले दिसत आहे.

 

आता आठ दिवसांपासून सोयाबीन काढणीला सुरूवात झाली आहे. पण घाटमाथ्यावर दररोजच पाऊस होत आहे यामुळे बहुसंख्य शेतात तळे साचलेले आहे. अनेकांचे सोयाबीन पाण्यात आहे. काहींच्या मुठी पाण्यात आहेत तर सोयाबीन काढून ठेवलेले बुचाडे लावलेल्या भोवती तळे साचलेले आहे त्यामुळे सध्या घाटमाथ्यावरील सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकतर निम्म्यावर घटलेले सोयाबीनचे भाव आणी आता अतिवृष्टीने होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

शेतकऱ्यांना शंभर रूपये किलोचे बियाणे पेरणीसाठी घेतले एका एकर साठी पंचवीस ते तीस किलो बियाणे लागते एक रासायनिक खताची बॅग तसेच ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साहाय्याने पेरणी केली जाते अडीच ते तीन हजार रुपये बियाणे दिड हजार खताची बॅग पेरणीसाठी दोन हजार अशा प्रकारे साडे सहा ते सात हजार रुपये खर्च आगोदर शेती नांगरट मोगडा पाळी पाच हजार रुपये एकुण बारा ते पंधरा हजार रुपये खर्च तसेच पिकांची खुरपण नंतर औषध फवारणी तीन ते चार हजार रुपये व काढणीसाठी पाच हजार रुपये अशा प्रकारे पंचवीस हजार रुपये साधारण एकरी खर्च येत आहे नंतर मळणी यंत्रात भरडणे जवळपास तीस हजार रुपये खर्च येतो

एकरी पाच ते दहा क्विंटल उत्पादन होते पाच हजार रुपये भाव व पाच क्विंटल उत्पादन गृहित धरले तर शेतकरी तोट्यात आहे सरासरीने आठ क्विंटल उत्पादन धरले तर सध्या साडेचार हजार रुपये भाव आहे तेव्हा छत्तीस हजार रुपये होतात व खर्च तीस ते बत्तीस हजार रुपये तेही चांगला माल असेल तर पण सध्या अतिवृष्टीने माल खराब होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here