जामखेड न्युज——
नगरसेवक बिभीषण धनवडेच्या मार्गदर्शनाखाली
जगदंबा मंडळाच्या पुढाकारातून होणार मंदिराचे काम, आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन!!!
जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथे जगदंबा महीला मंडळाच्या वतीने नगरसेवक बिभीषण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जगदंबा देवी मंदिर उभारणीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आ. प्रा राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच सालाबाद प्रमाणे प्रभागातील भाविकांना मोहटा देवी दर्शन धनवडे यांनी घडवून आणले तसेच यावेळी आ. शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. आरती नंतर मंडळाच्या वतीने आ. प्रा राम शिंदे सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, रमेश वराट, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, सोमनाथ राळेभात, पोपट राळेभात, सलीम बागवान, उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा, सुनील यादव सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आ. राम शिंदे यावेळी म्हणाले, प्रभाग क्रमांक १५ मध्ये बिबीषन धनवडे यांचे सामाजिक कार्या बरोबरच धार्मिक काम आहे. जगदंबा महीला मंडळ गेल्या अठरा वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करते. आता फक्त नऊ दिवसच नाही तर बारा महिने देवीची सेवा करण्यासाठीच नगरसेवक बिबिषन धनवडे यांनी देवीच्या मंदिराचे काम केले आहे. गेली अठरा वर्षापासून जगदंबा महीला मंडळ नवरात्र उत्सव साजरा करते. मी देखील भक्ती भावाने देवीच्या चरणी श्रध्दा करतोय अपल्या मनातील इच्छा पुर्ण करतो. संस्कार आणि संस्कृती महत्त्वाची आहे भक्तीच्या मार्गातून एका पिढीतुन दुसर्या पिढीला संस्कार देण्याची गरज आहे.

माझा नवस पुर्ण झाला आता तुम्ही देखील मोहटा देवीला निघाला अहात तुमचा देखील नवस पुर्ण होवो अशी इच्छा व्यक्त करतो. मी माजी आमदार होतो त्यावेळी सरकार गेले मी आता आमदार झालो आणि पुन्हा आपले सरकार आले. लवकच पुढील काम व्यवस्थित होईल. माझी पक्षाने दखल घेऊन मला आमदारकी दिली आहे. आता त्या संधीचे सोनं करणार आहे. आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असतो.
नगरसेवक बिबीषन धनवडे यांनी तुम्हाला येथुन पुढे नऊ दिवसच नाही तर तुम्हाला बारा महिने देवीची सेवा करण्यासाठीच मंदिराचे काम सुरू केले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी जी मदत लागेल ती करेल असे अश्वासनान देखील यावेळी आ. प्रा. राम शिंदे यांनी दिले. या वेळी जगदंबा महीला मंडळासह तालुक्यातील सर्वच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






