एका महिन्यात चार मोबाईल हँडसेटच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

0
245

जामखेड न्युज——

एका महिन्यात चार मोबाईल हँडसेटच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक
जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी!!! 

एका महिन्यांपूर्वी चार मोबाईल हँडसेट असलेली पिशवी एक लाख बासष्ट हजार रुपये किंमतीचे मोबाईल गेल्याची फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. यानुसार पोलीसांनी एका महिन्यात चारही मोबाईल हँडसेट व दोन आरोपींना अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.

एका महिन्यांपूर्वी फिर्यादी अतुल बंडू जगताप रा. जामखेड यांनी चार मोबाईल गेल्याची फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली होती त्यानुसार आरोपी
1 ) महादेव उर्फ माणिक हरीदास फुंदे रा. कांदेवाङी ता.धारुर जि.बीड
2) योगी बाळासाहेब जाधव रा. बुंदेलपुरा ता. जि. बीड
यांना सापळा रचुन अटक करुन सखोल
चौकशी करुन गुन्ह्यात गेलेले दोन विवो कंपनीचे x80 मोबाईल व एक महागङा आयफोन कंपनीचा
मोबाईल हँन्ङसेट असा एकुण 1,62,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.

जामखेड पोलीस स्टेशन यांनी आरोपींना अटक करुन आरोपींकडुन केला गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत दिनांक 01/09/2022 रोजी रात्री 09/00 वा.च्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे दुकान बंद
करुन जात असताना मोटाकसायकलची चावी दुकानात विसरली म्हणुन परत दुकानात जायचे म्हणुन त्यांच्याकङील त्यांनी लोनवर खरेदी केलेले 4 मोबाईल हँन्डसेट असलेली पिशवी मोटारसायकलच्या हँन्ङलला गुतवुन ठेवली व त्यांच्या ओळखीचे असलेले मित्र यांना पिशवीवर लक्ष ठेवायचे सांगुन फिर्यादी दुकानात चावी आणण्यासाठी गेले असता चावी घेवुन परत दुकानासमोर असलेल्या ठिकाणी आले असता
ओळखीचे असलेले मित्र यांनी फिर्यादी यांच्या अविश्वासाने 4 मोबाईल हॅन्डसेट असलेली पिशवी घेवुन फरार झाले होते.

त्यावरुन फिर्यादी यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने गु.र.नं. 420/2022 भादवि कलम 406,34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास श्री. संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक जामखेड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोना/संग्राम जाधव व पोकाँ/पवार, पोकाँ/राउत हे करीत होते.

गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी
1 ) महादेव उर्फ माणिक हरीदास फुंदे रा. कांदेवाङी ता.धारुर जि.बीड
2) योगी बाळासाहेब जाधव रा. बुंदेलपुरा ता. जि. बीड
यांना सापळा रचुन अटक करुन सखोल
चौकशी करुन गुन्ह्यात गेलेले दोन विवो कंपनीचे x80 मोबाईल व एक महागङा आयफोन कंपनीचा
मोबाईल हँन्ङसेट असा एकुण 1,62,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात जामखेङ पोलीसांना यश आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री.सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव
साहेब,जामखेङ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाङ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोहेकाँ/लोखंडे, पोकाँ/राठोङ तसेच गुन्हे शोध पथकाचे पोना/संग्राम जाधव,पोकाँ/पवार,पोकाँ/राउत, पोकाँ/आजबे यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोना/संग्राम जाधव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here