आमदार प्रा. राम शिंदे थेट भाजीबाजारात!!! जाणून घेतल्या शेतकरी, विक्रेते व व्यापारी यांच्या समस्या!!!

0
287

 

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे थेट भाजीबाजारात!!!

जाणून घेतल्या शेतकरी, विक्रेते व व्यापारी यांच्या समस्या!!!

जामखेड शहरात, जगदंबा माता लोहार देवी, दुर्गा माता, संतोषी माता, सोनार गल्ली, कालिका देवी, लक्ष्मी माता या ठिकाणी प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आरती नंतर आमदार प्रा. थेट भाजी बाजारात दाखल झाले व भाजी विक्रेते, शेतकरी व व्यापारी यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, रवी सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, पोपटनाना राळेभात, सोमनाथ पाचरणे, प्रविण सानप, प्रविण चोरडिया, तुषार बोथरा, राहुल राऊत, उद्धव हुलगुंडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, तात्याराम पोकळे, लहु शिंदे, अॅड पारे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने आज जामखेड शहरातील विविध दुर्गा माता मंदिरात प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी नवरात्र उत्सवाचे महत्त्व सांगितले. तसेच महिला जास्त भक्ती भावाने उपासना करतात देवाची आराधना करतात. तसेच सर्व जनतेला नवरात्र उत्सव व दसरा सणाच्या शुभेच्छा दिल्या जनसामान्य व शेतकरी वर्गावर कोणतेही संकट नको म्हणून आमदार प्रा. राम शिंदे यांचे अंबाबाईला साकडे घातले.

नंतर थेट भाजीबाजारात दाखल झाले व भाजी विक्रेते, शेतकरी व व्यापारी यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. भाजी विक्रेते व शेतकरी यांना आपल्या समोर माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे आल्याने व आपल्या बरोबर बोलत असल्याने शेतकरी, भाजीविक्रेते यांना आश्चर्याचा धक्का बसला अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here