जामखेड न्युज——
विकास कामाच्या जोरावर आदर्श प्रभाग करणारे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या तर्फे शेकडो महिलांना मोहटादेवीचे दर्शन
आपल्या विकास कामातून ओळख निर्माण करणारे प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक अमितभाऊ चिंतामणी यांनी प्रभागात शंभर टक्के क्राॅक्रिटीकरण, शंभर टक्के बंदिस्त गटारे व शंभर टक्के विद्युतीकरण व पाण्याची सोय असणारा प्रभाग १३ केला आहे. कामेही अत्यंत दर्जेदार केलेली आहेत. विकास कामाबरोबरच ते सामाजिक कामासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या नवरात्र उत्सव असल्याने शहरातील शेकडो महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवून आणले आहे. सुमारे पन्नास गाड्या नेल्या आहेत.
नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या आठ वर्षांपासून नवरात्र महोत्सवा निमित्ताने आपल्या प्रभाग क्रमांक तेरा मधिल महीला भाविकांना पाथर्डी येथील मोहटा देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात असतात .याच अनुषंगाने सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील नगरसेवक अमित चिंतामणी यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महीला भाविकांना मोहटा देवी दर्शन घडविले.
शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान पाथर्डी येथील मोहटा देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त श्रीक्षेत्र मोहटा देवी गडावर लाखोंच्या संख्येने येत असतात. याच अनुषंगाने धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेले भाजपचे आ. राम शिंदे यांचे खंदे समर्थक नगरसेवक अमित चिंतामणी हे गेली आठ वर्षांपासून महीला भाविकांना मोहटा देवी दर्शन घडवुन आणतात. याच अनुशंगाने आज गुरवार दि २९ रोजी सकाळी प्रभाग क्रमांक तेरा मधिल महीला भाविकांना मोहटा देवी दर्शन घडवुन आणण्यासाठी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी मोफत चार चाकी वाहनांची सोय केली होती. सुमारे पन्नास वाहनांमध्ये शेकडो महीलांनी मोहटादेवी या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच महीला भाविकांना नऊ दिवस उपवास आसल्याने दुपारी मोहटा देवीच्या पायथ्याला सर्वांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. दर्शन घडवुन आणल्याने प्रभागातील महीलांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
मोहटा देवी दर्शनासाठी निघताना मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला .यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, उमेश (काका) देशमुख, संजय जाधव, दिपक (महाराज) गायकवाड, वायभट मामा ,अॅड प्रविण सानप, केदार रसाळ ,भाजपा शहर उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे ,अभिजीत लोहकरे, दादा कलासागर ,यश कस्तुरे ,श्रवण चिंतामणी, अतुल पवार ,संदीप सांगळे ,गणेश काळे, सचिव मासाळ, गणेश काळे ,भाऊ परदेशी ,ईश्वर साळुंके ,निलेश भंडारी ,कीरण भांगे, सुर्यकांत माने ,यांच्या सह अनेक महीला व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.