आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त हनुमंत पाटील यांच्या तर्फे शेकडो महिलांची तुळजापूर, अक्कलकोट यात्रा

0
213
जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त हनुमंत पाटील यांच्या तर्फे शेकडो महिलांची तुळजापूर, अक्कलकोट यात्रा
आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांच्या तर्फे तुळजापूर, अक्कलकोट महिला यात्रेसाठी चौदा गाड्यांचे नियोजन केले त्यामुळे सुमारे पाचशे पेक्षा जास्त महिलांना नवरात्र उत्सवामध्ये तिर्थयात्रा घडली आहे. 
   कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांनी पदरमोड करत सुमारे १४ गाड्यांच्या साहाय्याने आज पाचशे महिलांना यात्रेसाठी पाठवले आहे तसेच उद्याही काही महिलांना तुळजापूर व अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी पाठवणार असल्याची माहिती सरपंच हनुमंत पाटील यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली. 

कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साकत मध्ये सरपंच हनुमंत काका पाटील यांनी साकत ते तुळजापूर , अक्कलकोट महिला यात्रेचे आयोजन केले. साकत , कोल्हेवाडी , पिंपळवाडी ,कडभणवाडी मधून एकूण १४ गाड्या मधून महिला यात्रा काढण्यात आली त्या यात्रेचे पूजन करताना सरपंच हनुमंत पाटील , गोरख वराट ग्रा पं सदस्य राजूभाऊ कोल्हे, जालिंदर नेमाने,गणेश कडभने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

     नवरात्र उत्सवामध्ये महिलांना तुळजापूर व अक्कलकोट या ठिकाणी यात्रेला जाण्यासाठी नियोजन झाल्याने समाधान व्यक्त केले तसेच आमदार रोहित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सरपंच हनुमंत पाटील यांचे आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here