जामखेड न्युज——
भगर खरेदी करताना नागरिकांनी घ्यावी ही काळजी
सध्या भगर विषबाधा प्रकरण मोठ्या प्रमाणावर समोर आल्याने प्रशासनाने पुढील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उपवास म्हटला की उपवासाचे अनेक पदार्थ डोळ्यांसमोर येतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा याचबरोबर भगर हा पदार्थ देखील सर्रास वापरला जातो. शिवाय अनेक डायट करत असलेले नागरिक देखील नाश्त्याला भगरीला प्राधान्य देतात. मात्र काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत भगरमुळे विषबाधा झाल्याची घटना समोर आली. यानंतर भगर बाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत. नवरात्र सुरू होण्यापूर्वीच भगर आणि उपवासाचे पदार्थ खाताना काय काळजी घायची याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाने माहिती पत्रक प्रसिद्ध केले आहे.
देशात तसेच महाराष्ट्र राज्यात सध्या नवरात्री उत्सव हा दि. 26 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबरपर्यंत असल्याने भावीकांमार्फत श्रद्धेचा भाग म्हणून उपवास ठेवण्यात येतो. उपवासाच्या काळात बऱ्याचदा भगरीचे सेवन मोठ्याप्रमाणात केल्या जाते. त्याबाबत अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत नागरीकांना अवाहन करण्यात येते की, नागरीकांनी भगर खरेदी करतांना ही घ्यावयायची काळजी घेणे आवश्यक आहे.
अशी घ्या काळजी?
भगर व इतर पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक/नोंदणी धारका कडुनच खरेदी करावेत.पॅकबंद असलेले नगर उपवासाचे पदार्थच विकत घ्यावेत. सदर पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बेंच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावेत. पॅकेटवर प्रक्रीया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले याचे तपशील असतो तो निट पाहून घ्यावा. त्यासह “Best Before म्हणजे भगरीची अंतीम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते ते ही तपासुन आणि खात्री करूनच खरेदी करावी. भगरीचे सुटे पिठ खुल्या बाजारातून / हातगाडी वरून विकत घेवू नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून आणि नंतर स्वच्छ धुवुन त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडुन पक्के खरेदी बिल घ्यावे. सकाळी बनविलेली नगर संध्याकाळी / रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करू नये. भगर आणि इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत, ते तयार करण्यासाठी पिण्या योग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा.
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
भगरीचे सुटे पिठ खुल्या बाजारातुन किंवा हातगाडीवरुन विकत घेवू नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून व नंतर स्वच्छ धूवुन त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडुन पक्के खरेदी बिल घ्यावे. सकाळी बनविलेली भगर रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करू नये. भगर व इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत व ते तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.