जामखेड न्युज——
येणारा काळ डिजिटल मिडियाचा असणार – गंगाधर काळकुटे
पत्रकारितेमुळे वंचित घटकांना न्याय मिळतो- आमदार रोहित पवार
सध्या प्रिंट मिडियाचे महत्त्व कमी होत चालले आहे व डिजिटल मिडियाचे महत्त्व वाढत आहे. येणारा काळ हा आॅनलाईनचा म्हणजे डिजिटल मिडीयाचा असणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी आता जास्तीत जास्त डिजिटल मिडीयाचा अवलंब करून आधुनिकतेची कास धरावी असे मत दैनिक सुर्योदयचे संपादक गंगाधर काळकुटे पाटील यांनी व्यक्त केले.

दैनिक सुर्योदयचा आठवा वर्धापनदिन जामखेड येथील सर्व पक्षीय नेते व अधिकारी यांच्या उपस्थितीत जामखेड येथील महावीर भवन येथे संपन्न झाला.

यावेळी कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, दैनिक सुर्योदयचे संपादक गंगाधर काळकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती, डॉ. भगवानराव मुरुमकर, अॅड डॉ. अरूण जाधव, शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टाफरे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, दिलीप गुगळे, बाफना उद्योग समूहाचे आकाश बाफना, संतोष फिरोदिया, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, सुंदरदास बिरंगळ, हवा सरनोबत, बापुसाहेब कार्ले, महेंद्र राळेभात, विकी घायतडक, मुक्तार सय्यद, शरद कार्ले, राहुल उगले, गफार पठाण, सुलताना शेख, उमर कुरेशी, संतोष नवलाखा, अमित गंभीर, मोहन पवार, सुर्योदयचे जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज पवार, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सह सचिव पप्पू भाई सय्यद, हनुमंत पाटील, काका चव्हाण, अविनाश बोधले, मंगेश आजबे, डॉ. संजय भोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी. के. मडके, प्राचार्य विकी घायतडक, जमीर सय्यद, मयुर भोसले, प्रविण उगले, सनी सदाफुले, मोहन गडदे, अभय शिंगवी, उद्धव हुलगंडे, प्रविण बोलभट, श्वेता गायकवाड, श्रीकांत जाधव, महावीर बाफना, राम निकम, अवधूत पवार, किरण रेडे, संजय वारभोग, अनिल अष्टेकर, रोहित राजगुरू, राजू भोगील, युवराज ढेरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना काळकुटे पाटील म्हणाले की, आपण नेहमी आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे. तरच स्पर्धेच्या युगात टिकू त्यामुळे डिजिटल मिडीयाचा स्वीकार करावा.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, पत्रकारितेमुळे वंचित घटकांना न्याय मिळतो. तसेच राजकारणी लोकांनाही काम करण्यासाठी बळ मिळते. कार्यक्रमाचे नियोजन सुर्योदयचे जामखेड तालुका प्रतिनिधी धनराज पवार यांनी केले होते.
कार्यक्रमाचे आभार दैनिक सुर्योदयचे उपसंपादक श्रीकांत जाधव यांनी मानले.