जातपडताळणीवर सखोल मार्गदर्शन – जिल्हा जातपडताळणी समितीचा उपक्रम – विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

0
151

 

जामखेड न्युज——

जातपडताळणीवर सखोल मार्गदर्शन – जिल्हा जातपडताळणी समितीचा उपक्रम ; विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगरच्या वतीने राहाता, संगमनेर व नेवासा तालुक्यातील सर्व विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयांतील जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९ व २० सप्टेंबर रोजी जातपडताळणी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात अर्ज कसे भरावे, परिपूर्ण प्रस्ताव आदींबाबतची माहिती देण्यात आली.

शासनाने बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही आता जातवैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. १९ सप्टेंबर रोजी लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात व २० सप्टेंबर रोजी नेवासा येथील श्री.ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारुती पानसरे, समितीचे सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी भागवत खरे यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसे भरावेत? त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे? शाळा, महाविद्यालय यांनी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे? विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव कशा प्रकारे सादर करावेत? ऑनलाइन अर्जांचा भरणा कसा करावा? त्यानंतर काय प्रक्रिया अंवलबिण्यात यावी. या विषयांवर उपस्थित प्राचार्य व कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी काही विद्यार्थ्यांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप ही करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here