जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयाची ‘लम्पी’ जनजागृती मोहीम – लम्पी’ आजार जनजागृती मोहीमेचा पशुपालकांनी लाभ घेण्याचे प्राचार्य सुनिल नरके यांचे आवाहन
जामखेड तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्या मदतीला जामखेड महाविद्यालय धाऊन आले आहे. ‘लम्पी’ आजाराचे प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाल्याने पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आजाराविषयी अज्ञान आणि भितीमुळे पशुपालक संकटात सापडला आहे. अशातच आपली सामाजिक जबाबदारी ओळखून जामखेड महाविद्यालयाने पुढाकार घेत ‘लम्पी जनजागृती मोहीम’ आखली आहे.

जामखेड महाविद्यालय आणि पंचायत समिती जामखेडचा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लम्पी आजार जनजागृती मोहिम कार्यक्रम घेण्यात येणार आहे. रविवारी दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८:०० वाजता नाहुली येथे हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ, तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड इत्यादी तज्ञ उपस्थित राहून शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लम्पी आजार लसीकरण सुरू आहे. त्याविषयी शास्त्रीय माहिती व उपाययोजना करण्यासाठी शेतकरी जागृती महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच दि पिपल्स सोसायटीचे अध्यक्ष मा. उद्धव ( बापू) देशमुख, उपाध्यक्ष अरुण (काका) चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, आणि सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यात महाविद्यालयाच्या पुढाकारातून ही जनजागृती करण्यात येणार आहे. मोहिमेतील पहिला कार्यक्रम नाहुली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.दिलिप बहीर यांच्या पुढाकाराने आणि ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य यांचे सहकार्याने रविवारी नाहुली येथे होत आहे. पंचक्रोशीतील सर्व शेतकरी पशुपालक बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी केले आहे.




