जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयात व महसुल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ई-पीक पाहणी कार्यशाळा संपन्न
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजाशी जोडून घेत शेती आणि तत्सम प्रश्नांवर पुढाकार घेतला जावा यासाठी जामखेड महाविद्यालयात महसूल विभागाच्या सहकार्याने ‘ई-पीक पाहणी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महसूल विभागाचे जामखेड मंडळाधिकारी श्री. नंदकुमार गव्हाणे व जामखेड तलाठी श्री. विश्वजित चौगले यांनी ई पीक पाहणी अँप वापरण्याची कार्यपद्धती व प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी भूषविले.
अध्यक्षीय भाषणात शेतीशी निगडित अनेक बाबींचे विवेचन केले .यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डी.के.पवार, प्रा. म्हस्के सर, प्रा. केळकर सर, प्रा. देशमुख सर, प्रा. राऊत सर, प्रा. तरटे सर, प्रा.मोहिते सर प्रा. दिंडळे सर इ. प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यालयीन अधिक्षक श्री ज्ञानदेव बांगर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी केले.