जामखेड करमाळा रस्त्यावरील एका हाॅटेलवर तरूणाचे अकस्मित निधन

0
263

 

जामखेड  प्रतिनिधी 

              जामखेड न्युज——

जामखेड करमाळा रस्त्यावरील एका हाॅटेलवर विजय महादेव वाळुंजकर ( वय २४) या तरूणाचे आकस्मित निधन झाले आहे.

जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर चुंबळी फाट्या जवळील एका हाॅटेलवर जवळा येथील विजय महादेव वाळुंजकर ( वय २४ ) याचा मृतदेह सकाळी निदर्शनास आला. 

याबाबत हकीगत अशी की, सोमवारी (दि. १२) साडेअकरा वाजता विजय महादेव वाळुंजकर हा आपले राहते घर जवळा येथून पुण्याला जाण्यासाठी निघाला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि.१३ ) सकाळी सहा वाजता त्याने आपल्या मित्राला फोन केला. माझ्या छातीत दुखत आहे. मला लवकर दवाखान्यात घेऊन चला असे सांगितले होते. 

सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे जाऊन त्यांना त्यांची रुग्णवाहीका घेऊन समक्ष घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी विजय यास जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून पोहोच केले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशांक वाघमारे यांनी विजय यास मृत घोषीत केले.

या घटनेची खबर अजित महादेव वाळुंजकर यांनी दिली.
पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत तपास करत आहेत.
रजी नंबर ५२/२०२२, सी.आर.पी. सी १७४ प्रमाणे दि. १३/९/२०२२ प्रमाने दाखल झाले आहे

चौकट –

पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत म्हणाले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन केला की ते कोणत्याही क्षणी आम्हाला मदत करतात. आत्ता १०८ ही गाडी घटनास्थळावर गेली होती. परंतु त्यांनी मृतदेह आणला नाही. तसेच बऱ्याच वेळा खाजगी गाडीवाले मृतदेह आणण्यास आडवा आडवी करतात परंतु सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे मी गेलो असता ताबडतोब गाडीत बसले आणि रुग्णवाहिका घेऊन जामखेड ग्रामीण रुग्णालयात मृतदेह दाखल केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here