जामखेड न्यूज—-
“हनुमंत पाटील यांनी निवडणुकीला सामोरे जावे”
सामान्य कार्यकर्ता तुम्हाला पराभूत करेल -नागराज मुरूमकर”
“डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या जीवावर निवडून आलेल्यांना निवडणुकीची खुमखुमी असेल तर ग्रामपंचायचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे- नागराज मुरूमकर”
आमच्या नेते भगवान दादा मुरुमकर यांना निवडणूकीचे आहवान देण्यापुर्वी साकत ग्रामपंचायत प्रभाग पाच मधुन आमचे नेते भगवान दादा मुरुमकर यांचा आदेश पाळुन आम्ही तुम्हाला मतदान करुन निवडणुन आणले आहे.
जर तुम्हाला पैश्याची व निवडणुकीची एवढीच जर खुमखुमी घंमेड असेल तर व आपल्याला स्वाभिमान असेल तर प्रभाग पाच मध्ये राजिनामा देऊन निवडणुकीला सामोरे यावे माझ्या सारखा सामान्य कार्यकर्ता तुमचे चॅलेंज स्विकारायला तयार आहे.मग आपण किती पाण्यात आहेत हे पाहुण पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवावी असे जाहीर आवाहन सरपंच हनुमंत पाटील यांना नागराज मुरूमकर यांनी दिले आहे.
आमदार राम शिंदे यांना आमदार रोहित पवारांनी आवाहन दिले होते. या आवाहनाला जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर यांनी उत्तर देताना त्यांनी म्हटले होते की, आमदार रोहित पवारांनी आगोदर राजीनामा द्यावा आवाहन द्यावयाचे असेल तर ते खड्ड्यांमध्ये द्यावे असे म्हटले होते तेव्हा याला उत्तर हनुमंत पाटील यांनी उत्तर देताना म्हटले होते की, आमदार रोहित पवारांवर बोलण्याआधी त्यांनी आमच्याशी सामना करावा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांना दाखवू असे आवाहन दिले होते. याला उत्तर डॉ. भगवानराव मुरुमकर यांचे समर्थक नागराज मुरूमकर यांनी दिले आहे. ते म्हणाले की. डॉ. भगवानराव मुरुमकर यांना आवाहन देता त्यांच्याच जीवावर निवडून आले आहात तुम्हाला जर पैशाची व निवडणुकीची एवढी खुमखुमी असेल तर ग्रामपंचायत प्रभाग पाचचा राजीनामा द्यावा आणी परत निवडणूकीला सामोरे जावे सामान्य कार्यकर्ता तुमचा पराभव करेल. असे नागराज मुरूमकर यांनी म्हटले आहे.