जामखेड न्युज——
ढोलवादन, लाठी-काठीचा खेळ ते बाप्पाच्या रथाचं सारथ्य…गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवारांची चर्चा
कर्जत-जामखेड मधील अनेक मंडळांमध्ये सहभागी होत कुठे गणरायाची आरती, कुठे सांस्कृतिक कार्यक्रम तर कुठे लेझीम तर कुठे डान्स केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आमदार रोहित पवारांनी पुणे येथील अनेक गणेश मंडळाच्या मिरवणुकीत हजेरी लावली यावेळी ढोलवादन, लाठी-काठीचा खेळ ते बाप्पाच्या रथाचं सारथ्य…गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवारांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली.
राज्यातील गणपती विसर्जन मिरवणुका या कायमच चर्चेत असतात. यंदा दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. वाजत-गाजत बाप्पाला निरोप देताना भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी अनेक राजकीय नेतेही गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले दिसले.परंतु या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधून घेतलं. रोहित पवार पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले दिसले.
रोहित पवारांनी यात सहभागी होत मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तांचा आनंद द्विगुणित केला.
पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते सहभागी झालेले दिसले. यावेळी तरुणांकडून मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
रोहित पवारांनी या पथकाबरोबर लाठी-काठी फिरवत मर्दानी खेळ खेळत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले.
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवारांनी बाप्पासाठी ढोलवादनही केले. पुण्यातील मानाच्या तिसरा गुरुजी तालिम गणपती मंडळासमोर ढोल पथकाबरेबर त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.
विर्सजन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका बाप्पाच्या रथाचं सारथ्य करतानादेखील रोहित पवार दिसले. एवढंच काय रोहित पवारांनी कार्यकर्त्यांसह उसाचा रस आणि कचोरी खाण्याचा आनंद लुटला.
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवार गुलालाने पूर्णत: माखून गेले होते.पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.