जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
गेल्या ३५ वर्षापासून गंभीर परिवार बेकरी व्यवसायामध्ये सेवा देत आहे. सतसंगाद्वारे देखील ते सामाजिक व अध्यात्मिक काम करत आहेत. व्यवसाया बरोबरच गंभीर कुटुंबीय हे सामाजिक नाळ जोडण्याचे काम करत आहेत. आपल्या विश्वासहार्यतेच्या बळावर जामखेडकरांच्या पसंतीस उतरले आहेत. यामुळेच न्यु महाराष्ट्र बेकर्स तिसरी शाखा सुरू करत आहे. या शाळेचे उद्घाटन निरंकारी महात्मा रमेश खूपचंदान, अमित गंभीर यांच्या मातोश्री उषाजी गंभीर यांच्या हस्ते संपन्न झाले.

व्यवसाय कसा करावा, आणि ग्राहकांना सेवा कशी द्यावी याचे उत्तम उदाहरण म्हणून, गंभीर बंधू आणि कुटूंबियांकडे पाहत आलो आहोत, त्यांची तिसरी पिढी आज जामखेड करांच्या सेवेत, न्यु महाराष्ट्र बेकर्स च्या नावाने सेवा देत आहे, एक चांगले व्यावसायिक म्हणून गंभीर कुटुंबीय पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेतच पण या व्यवसाया बरोबर सामाजिक नाळ जपत, स्तस्तंग द्वारे त्यांच्या महात्म्याद्वारे केले जाणारे स्वच्छतेचे कार्यही उल्लेखनीय आहे आसे मत दुर्गा मोबाईल चे संचालक सुनिल जगताप यांनी नविन दालनाच्या भेटी दरम्यान केले.

गेल्या ३५ वर्षापासून बेकरी व्यवसायामध्ये आम्ही सेवा देत आहोत आणि अजून उत्तमरीत्या ग्राहकांना सेवा देता यावी आणि नवीन नवीन वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी या नवीनरीत्या या दालनाची तिसरी शाखा बीड कॉर्नर जवळ सुरू करण्यात आली आहे आसे मत दालनाचे मालक अमित गंभीर यांनी व्यक्त केले आहे.


यावेळी जामखेड शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हभप हरिभाऊ काळे महाराज तेलंगशी, हभप उत्तम महाराज वराट साकत, हभप राजाभाऊ मेत्रे, यांनी आशिर्वाद दिले यावेळीसामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रदिप टाफरे, सुनील जगताप, दिगंबर चव्हाण, प्रफुल्ल सोळंकी, कॅप्टन लक्ष्मण भोरे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, धनराज पवार, लटके यांच्या सह शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.








