जामखेड न्युज——
एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण बेंगलोर येथे पूर्ण करून तालुक्यातील साकत येथील सौरभ लहाने गावी आला असताना जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सौरभ लहाने या देशसेवकाला पंचायत समिती मध्ये बोलावून सत्कार केला.

सौरभ लहाने आर्मी मध्ये भरती झाला यानंतर बेंगलोर येथे कोर (ASC) मध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करत तो सुट्टीवर आला असताना पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.


चि.सौरभ सतीश लहाने यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल व त्यांनी सैन्य दलातील असणार खडतर प्रशिक्षन पूर्ण केल्याबद्दल प्रकाश पोळ गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड यांच्या शुभहस्ते पंचायत समिती जामखेड येथे सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर, सतीश लहाने (वडील) , जितेंद्र रोकडे , युवराज पाटील व श्री जगधने मामा उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की, राष्ट्रीय कार्यासाठी सदैव कटिबद्ध राहून आपले कर्तव्य समर्पित भावनेने बजावून भारत मातेची अविरतपणे सेवा करणाऱ्या सैनिकांचे कार्य निश्चितपणे उल्लेखनीय व अभिमानास्पद आहे. सौरभचा आदर्श घेऊन गावातील जास्तीत जास्त युवकांनी देशसेवक व्हावे असे आवाहन केले.








