मदारी समाजाच्या वसाहती साठी वंचितचे धरणे आंदोलन सुरूच जोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार -अॅड डॉ. अरूण जाधव कालही केले होते अर्धनग्न आंदोलन

0
184
जामखेड प्रतिनिधी 
                   जामखेड न्युज——
     मदारी समाजाच्या वसाहतीचे बांधकाम तात्काळ चालू व्हावे,यासाठी जामखेड पंचायत समिती समोर वंचितचे धरणे आंदोलन चालू झाले आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज बांधवांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम प्रत्यक्षपणे जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत जामखेड तालुक्यात कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नाही. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे  भटके-विमुक्तांचे राज्य समन्वयक ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी कालच दिला होता आणी खर्डा चौकात अर्धनग्न आंदोलन केले आहे आज जामखेड पंचायत समिती समोर वंचितचे धरणे आंदोलन चालू झाले आहे. 
   
 जामखेड तालुक्यातील खर्डा येथे गेल्या 200 वर्षापासून वास्तव्य असलेल्या मदारी समाज बांधवांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू करावे या मागणीसाठी जामखेड शहरातील खर्डा चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भटके मुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक 31 ऑगस्ट या भटके-मुक्त दिनानिमित्त अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
       खर्डा येथील मदारी समाजाचे प्रतिनिधी सलीम मदारी, मुस्तफा मदारी, कबीर मदारी, रवींद्र शिरसाट, फकीरा मदारी, सागर ससाने, हुसेन मदारी, रहीम मदारी, फकीर मदारी, मोहम्मद मदारी, असलम मदारी, सिकंदर मदारी, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, वैजनाथ केसकर, संतोष चव्हाण, विशाल पवार, द्वारका पवार, तुकाराम पवार, बापू ओहोळ आणि अरुण डोळस आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
       सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सुमारे दोन तास खर्डा चौकातील वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार व ग्रामसेवक सातपुते त्यांनी पंचायत समितीच्या वतीने आणलेले पत्र स्वीकारण्यास   ॲड. डॉ अरुण जाधव यांनी स्पष्ट नकार दिला. प्रशासनाने प्रत्यक्ष काम सुरू न करता पत्राद्वारे केवळ आश्वासन देणे म्हणजेच आंदोलन कार्यकर्ते व मदारी समाज बांधवांना झुंलवत ठेवणे होय असे मत सलीम मदारी यांनी व्यक्त केले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, बजरंग सरडे, मुस्लिम पंच कमिटी सदस्य अजहर काजी, इस्माईल टेलर, ह.भ.प गाडे महाराज यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. आज पंचायत समिती समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. 
       यावेळी बोलताना ॲड.डॉ अरुण जाधव म्हणाले खर्डा येथील मदारी मेहतर समाजाचे वंशज गेल्या साठ वर्षापासून खर्डा बाजार तळातील बाजाराच्या ओट्यावर पाल टाकून राहतात. जामखेड तालुक्याला दोन आमदार एक खासदार असे तीन लोकप्रतिनिधी असून देखील मदारी वसाहतीचा प्रश्न पाच वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तो पर्यंत वंचित बहुजन आघाडी आपले आंदोलन सुरूच ठेवीन. गुरुवार दिनांक १ सप्टेंबर पासून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात मदारी समाज बांधवासह वंचित बहुजन आघाडीचे कार्येकर्ते धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्ता किंवा मदारी समाज बांधवांना काहीही झाले तरी  लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here