वीज पडून महिलेचा मृत्यू तिघे जखमी केज तालुक्यातील काळेगाव येथील घटना

0
248

 

जामखेड न्युज——

शेतातून घरी येत असताना अचानक विजांच्या
कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे झाडाखाली शेतकरी कुटूंब झाडाखाली थांबले. यावेळी वीज पडून महिलेचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीज जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे गुरुवारी (दि. 31 ) सायंकाळी घडली.

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील आत्माराम माणिक आगे, अन्नपूर्णा आत्माराम आगे, रामरतन चंद्रकांत आगे आणि शिला रामरतन आगे हे शेतकरी कुटुंब शेतात होते. सायंकाळच्या सुमारास अचानक काळेगाव शिवारात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

म्हणून हे कुटूंब एका झाडाखाली थांबले. यावेळी वीज कोसळली. यात शिला रामरतन आगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे ही भाजले असून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी केज ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद
करण्यात आली आहे.

चौकट
शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथे बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. जाटनांदूरसह परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत होता. यावेळी जेधेवाडी येथील रावसाहेब गणपत जेधे यांच्या घरावर वीज पडली. यामध्ये म्हैस जागीच ठार झाली. तर पती पत्नी बालंबाल बचावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here