ल. ना. होशिंग विद्यालयाचे शिष्यवृत्ती परिक्षेत दैदिप्यमान यश

0
310

जामखेड प्रतिनिधी
               जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यातील शैक्षणिक दृष्ट्या प्रगब्ल संस्था असलेल्या दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे एन. एम. एम. एस. परीक्षेत ७ तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले असून एन. एम. एम. एस. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थांना वार्षिक १२००० तर सारथी शिष्यवृत्ती पात्र झालेले विद्यार्थ्यांना वार्षिक ९६०० रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

एन. एम. एम. एस. परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी

१) प्रेम आनंद जाधव, २)यश बाळासाहेब गोरे, ३)गौरी शिरसागर, ४) प्रगती संतोष देठे, ५) अनुराधा रमेश गीते, ६)अश्विनी आजिनाथ आंधळे, ७) हर्षल सचिन कुमार खताळ, अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची असून या विद्यार्थ्यांना प्रति वर्ष १२००० रुपये अशी ४ वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

सारथी शिष्यवृत्ती पात्र झालेले विद्यार्थी

१) वराट हरीओम हनुमंत, २) केवारे आदित्य दत्तात्रय, ३) ढवळे आदित्य केरनाथ, ४) सातपुते साईराज शिवाजी, ५) वराट सुजल चंद्रकांत, ६) जगताप कार्तिक राजेंद्र, ७) ढवळे राजेश मोहन, ८) राळेभात रेश्मा राजेंद्र, ९) चौधरी राजनंदिनी कल्याण, १०) जाधव अंकिता रामचंद्र, ११) शिंदे अमृता बळीराम, १२) धुमाळ उत्कर्ष नागेश अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची असून या विद्यार्थ्यांना प्रति वर्ष ९६०० रुपये अशी ४ वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, हनुमंन वराट (बुध्दिमत्ता), सुरज गांधी (गणित), बबन राठोड व रोहित घोडेस्वार (विज्ञान), बाळासाहेब पारखे व विशाल पोले (सामाजिक शास्त्रे), यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे अध्यक्ष उध्दव बापू देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, व सर्व संचालक व पालकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here