Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या चित्रपट निर्माते रणजित गुगळे यांच्या २०२२ मध्ये प्रकाशित होणाऱ्या “महात्मा” चित्रपटाची निर्मिती...

चित्रपट निर्माते रणजित गुगळे यांच्या २०२२ मध्ये प्रकाशित होणाऱ्या “महात्मा” चित्रपटाची निर्मिती सुरू

0
559
जामखेड प्रतिनिधी 
  जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
आपल्या “डबलसीट”, “मुरब्बा”, ” गर्लफ्रेंड” व “धुराळा” अशा चार यशस्वी चित्रपटांच्याानिर्मीती नंतर सामाजिक क्षेत्रात महान कामे केलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकणार्‍या “महात्मा” चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून पहिल्या भागात महात्मा फुले व दुसऱ्या भागात सावित्रीबाई फुले अशा दोन भागात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या
 पोस्टर लाँचिंगचा कार्यक्रम नुकताच पार पडला पडला असून २०२२ या पुढील वर्षांत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटचे निर्माते व एच. यु. गुगळे परिवाराचे सदस्य रणजित गुगळे यांनी दिली.
          HUGE प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मित होत असलेेल्या या चित्रपटाचे निर्माते म्हणून रणजित गुुगळे व अतिश जोग, दिर्ग्दशक समीर विध्दांस तर संगीतकार म्हणून प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल हे काम पाहणार आहेत. सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या महामानवांचा सन्मान व्हावा व त्यांच्या संघर्षमय जीवनापासून समाजाला प्रेरणा मिळावी या हेतूने निर्माण केलेला हा चित्रपट चित्रपटक्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!