जामखेड न्युज——
देशातील प्रत्येक खेड्यापाड्यातील घरात पाण्याचा नळ उपलब्ध करुन देण्याची मोठी योजना केंद्र सरकार राबवत आहे. आतापर्यंत प्रत्येक घरात नळ योजनेंतर्गत 6 कोटी घरांमध्ये नळ बसवण्यात आले आहेत. खरंतर, खेड्यांमधील पाण्याची टंचाई लक्षात घेता सरकारने ही योजना सुरू केली आहे. भारतात अजूनही अशी अनेक गावं आहेत जिथं लोकांना पाणी भरण्यासाठी विहिरीवर किंवा इतर ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये पाण्याचा नळ बसवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात आहे.
यानुसार जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील सोनेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांच्या हस्ते भूमीपूजन झाले आहे त्यामुळे आता गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार आहे.

केंद्र सरकारचा ७०% तर राज्य सरकारचे ३०% निधी असलेली जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यात पहिल्यांदाच ७५ लक्ष निधी असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोनेगाव येथे पुणे बास्केटबॉलचे सचिव, धनेगाव सेवा सोसायटीचे संचालक प्रा. सचिन सर गायवळ यांच्या शुभहस्ते पार पडले

त्याप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष पै. शरद कार्ले, सोनेगावचे सरपंच पद्माकर बिरंगळ, तरडगाव वंजारवाडी, दौंडाचीवाडीचे सरपंच डॉ. जयराम खोत ,पिंपळगाव उंडाचे सरपंच गणेश जगताप, पोतेवाडीचे सरपंच प्रवीण पोते, सातेफळचे सरपंच गणेश लटके, अण्णा वायसे, अर्जुन वायकर,आश्रू खोटे, मारुती बोलभट, विलास मिसाळ , अभी मिसाळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य व पंचक्रोशीतील ग्रामस्त उपस्थित होते.

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जल जीवन अभियानांतर्गत या योजनेसाठी 11,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात एकूण खर्च काढला असता तो वाढून 23,500 कोटींवर गेला आहे. यासाठी सरकारला अतिरिक्त रक्कमेची वाटप करावी लागली. समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, या योजनेंतर्गत भारतातील 278 लाख कुटुंबांमधील 6 कोटी लोकसंख्येला घरात शुद्ध पाणी देण्यात आलं आहे.
मोदी सरकारच्या या योजनेसाठी यूएन एजन्सी, गैर-सरकारी संस्था / सीबीओ, सीएसआर संस्था, ट्रस्ट, प्रतिष्ठानं अशा अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीसमवेत भागीदारी करण्यात आली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी 2024 पूर्वी मिशन पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
2019 मध्येच झाली योजनेची घोषणा
15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घरात पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन अभियानाची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक खेड्यातल्या घरात पाणी उपलब्ध होईल, असं सांगण्यात आलं होतं.