संपादीत जमीनींपोटी २७ शेतकऱ्यांना ४कोटी रुपयांचा मोबदला– खासदार डॉ. सुजय विखे

0
235

जामखेड न्युज——

तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत झालेल्या सात गावांमधील २७ शेतकऱ्यांच्या जमीनीना ४ कोटी २६ लाख रुपयांचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून २०१७ पासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यात यश आले असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ कल्याण विशाखापट्टणम हा मार्ग पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी,देवराई,माळीबाभूळगाव निवडूंगे,शेकटे,वाळूंज करंजी या सात गावांमधून जात आहे.यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने २७ शेतकऱ्यांचे एकूण १५ हजार ७२८ चौ.मी.क्षेत्र संपादीत केले होते.जमीनीचे संपादन झाले तरी शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळालेला नव्हता.

या मोबदल्याचा प्रश्न २०१७ पासून प्रलंबित राहीला होता.यासंदर्भात खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यांनतर २७ शेतकऱ्यांना त्यांच्या संपादीत झालेल्या जमीनींचा मोबदला मिळण्यातील अडचणी दूर झाल्या असून १७ ऑगस्ट रोजी २७ शेतकऱ्यांपैकी १० शेतकऱ्यांचे १ कोटी ५८ लाख २१ हजार २८६ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असून उर्वरित शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास रक्कम त्वरित जमा होणार असल्याचे खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

कल्याण विशाखापट्टणम या महत्वपूर्ण महामार्ग नगर जिल्ह्य़ातून जात असून भुतेटाकळी ते मेहेकरी इतक्या ५२ किमी लांबीचे हे अंतर आहे.यापैकी बरेच अंतर पाथर्डी तालुक्यातील सात गावांमधील असल्याने या गावातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचा मोठा लाभ या गावांना होईल असा विश्वास खा.डॉ विखे यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने या रस्तांची काम वेगाने पुढे जात आहेत.रस्ते विकासाचा मोठा लाभ नगर जिल्ह्याच्या दळणवळणासाठी होणार असून उद्योग तसेच व्यापारी क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी असल्याचे विखे पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here