स्वच्छ विद्यालयात बसरवाडी शाळा राज्यात प्रथम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान

0
393
जामखेड न्युज——
   जामखेड तालुक्यातील पहिली आयएसओ शाळा, आदर्श शाळा, जिल्ह्यात प्रथम क्रमांकाच्या शाळेने आता राज्यातही स्वच्छ विद्यालय म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शाळेला सन्मानित करण्यात आले. याबद्दल शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र दिन 15 ऑगस्टलाच पोलिस परेड ग्राऊंड अहमदनगर येथे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते स्वच्छ विद्यालय पुरस्कार sub-category covid 19 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आलेल्या जामखेड तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा बसरवाडीचा सन्मान करण्यात आला.सत्काराच्या प्रसंगी नामदार साहेबांनी शालेय मंत्रीमंडळ संदस्य समृध्दी घुमरे व शताक्षी चव्हाण यांच्या हातात हात देवून अभिनंदन केले.पाठीवर कौतुकाची थाप दिली.सरपंच हनुमान उतेकर,ग्रामपंचायत सदस्य भाऊ पिंपरे,शा.व्य.अ.मारूती निकम,मुख्या.एकनाथ चव्हाण यांच्याशी चर्चा केली.व कौतुक केले.
    जामखेड तालुक्यातील बसरवाडी शाळेच्या सन्मानाबद्दल शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी, कडूस साहेब, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, केंद्रप्रमुख किसन वराट, कोल्हेवाडी व आठवड येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य सह पत्रकार, ग्रामस्थ, यांच्या सह अनेक मित्र मंडळी अधिकारी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.  
बालाघाटाच्या डोंगरातील एक वाडी,100% ऊसतोड मजूर असणारे ग्रामस्थ यांची शाळा महाराष्ट्रात प्रथम येते.हि गोष्ट महाराष्द्रातील प्रत्येक तांडा,पाडा,वस्ती,वाडी,गाव यांच्यासाठी आत्मविश्वास देणारी आहे.बसरवाडी येवू शकते तर माझी शाळा का नाही? महाभारतात यक्षाच्या सर्व प्रश्नाची बरोबर उत्तरे दिल्यावर यक्षाने युद्धिष्टराला विचारले,”तुझे तर पाच भाऊ मुर्चित होऊन पडले आहेत.तू सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली.ठरलेल्या अटीप्रमाणे मी तुझा एकच भाऊ जिवंत करू शकतो.कोणता करू?” युद्धिष्टराने सांगितले,”माझ्या नकुलला जिवंत करा.” आता यक्षालाच प्रश्न पडला.भिम अर्जुन सारखे रथीमहारथी असताना हा नकुलचे नाव का घेतो?त्याचे उत्तरही युद्धिष्टराने दिले, माझा  नकुल सगळयात कुमकवत आहे.तो उठला पाहिजे बाकीचे आपोआप उठतील.यक्षाने खूष होऊन सगळयांना जिवंत केले.हि गोष्ट फार महत्वाची आहे.आपल्यालाही ही गोष्ट लागू होते.शहरातील,गावातील शाळा बंद पडणार नाहीत.खरी समस्या वाडी-वस्तीची आहे.त्यांच्या या शाळा पटाअभावी बंद पडत आहेत.त्यांना खरं उठवण्याची,आधार देण्याची  गरज आहे.त्या टिकल्या की गावात,शहरात जिल्हा परीषदेच्या शाळेकडे पालकांचा कल वाढलेला दिसतो आहे.बसरवाडीच्या पुरस्काराने हे नक्की होईल आणि झालेच पाहिजे.तरच गोरगरिबांची हि मुलं शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील.माझ्या वाडीवस्तीवरील शिक्षकांनी तेच केले आहे.महाराष्ट्रातील 90%आदर्श शाळा हया वाडी-वस्तीवरील आहेत.गाव,शहरे त्यात मागे आहेत असा त्याचा अर्थ नाही.आम्ही एकमेकांना पुरकच आहोत.
जामखेड तालुक्यातील पहिली आयएसओ शाळा आता जिल्ह्यात सर्वात स्वच्छ शाळा म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक व सहकार्य करणारे ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्व शाळांनी पुरस्कारापुरते न राहता सातत्य ठेवावे.कधी कधी शिक्षक बदलले, मुख्याध्यापकाची बदली झाली की त्या शाळा मागे पडत जातात तसे होऊ देवू नका असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले होते. 
   
 नायगावचे केंद्राचे केंद्रप्रमुख किसन वराट ,जिवलग मित्र दिपक चव्हाण, मु.अ.एकनाथ (दादा)चव्हाण आणि खूप खूप योगदान असणारे बसरवाडीचे आदर्श शिक्षक जिवलग मित्र तात्या घुमरे सर, शा.व्य.समिती अध्यक्ष मारूती निकम, ग्रा.पं.सदस्य भाऊसाहेब पिंपरे, सर्व शाळा व्य.समिती बसरवाडी सरपंच हनुमान उतेकर, उपसरपंच विठ्ठल देवकाते व सर्व ग्रामपंचायत टिम शिऊर,प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय गटविकास अधिकारी प्रकाजी पोळ ,गटशिक्षणाधिकारी प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय कैलास खैरे,जामखेड तालुका सर्व शिक्षक सर्वांचेच खूप खूप अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here