जामखेड न्युज——

जमीन, घर-दार नसलं तरी काय झालं, माझ्या झोपडीला मी तिरंगा झेंडा लावलाय, या आपल्या झेंड्याला मी सलाम करतुया… ‘झेंडा माझा, मी झेंड्याचा, आपल्या झोपडीला तिरंगा झेंडा उभारुन देशाभिमान बाळगणाऱ्या घर – दार नसलेला साकत घाटातील बन्सी काळे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

आपल्या जगण्याची व्यथा मांडत होता.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले आहे. या अभियानानिमित्त प्रत्येक देशवासीयांना आपल्या घरावर तीन दिवस तिरंगा फडकवण्याची परवानगी दिली आहे. अनेक जणांनी आपल्या घरावर, दुकानांवर व शासकीय इमारतींवर आज मोठ्या डौलाने तिरंगा ध्वज फडकवला.

जामखेड तालुक्यातील साकत येथे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच हनुमंत पाटील यांनी घरोघरी जाऊन तिरंगा ध्वज वाटप केले त्यामुळे साकत परिसरात
घरांवर, दुकानांवर व सर्व शासकीय इमारतींवर आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण परिसर तिरंगामय झालेला दिसून आला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत बन्सी काळे यांनी आपल्या झोपडीवर तिरंगा ध्वज फडकविला आहे. घर नाही, शेत नाही. झोपडीत वीज, पाणी सुविधा नाही एका निर्जन स्थळी डोंगरात झोपडी बांधुन ते राहतात. शेत,घर काहीही नसले तरी देशप्रेम मात्र नसानसात आहे त्यामुळे तिरंगा ध्वज झोपडीवर फडकत आहे.

बन्सी काळे, मुलगा नितीन काळे तसेच दुसरा मुलगा असे तीन कुटुंब साकत घाटात डोंगरावर झोपड्या बांधून राहतात तिथे कसलीही सुविधा नाही तरीही देशप्रेमाने भारावून आपल्या झोपडीवर तिरंगा ध्वज लावलेला आहे.
जामखेड-पाटोदा राज्यमार्गा वरून जाणारे येणारे लोक झोपडीवरील तिरंगा ध्वज पाहुन आपल्या देशातील सर्व सामान्य नागरिकांना किती जाणीव जागृती आहे याची कल्पना येते.