जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
मतदारसंघातील शैक्षणिक व आरोग्याविषयी कामात तडजोड करणार नाही. मतदारसंघातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी देशातील अग्रगण्य असलेल्या अँमेझाँन या कंपनीशी कर्जत जामखेड मतदारसंघाचा टाँय केला आहे.
जामखेड शहरातील खर्डा चौकातील उर्द शाळेला इन्टरअँक्टीव पँनल हे अधूनिक शैक्षणिक साहित्य आ रोहित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आले यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी उर्दू शाळेतील मुलींनी आ. रोहित पवार यांना राख्या बांधल्या.
तसेच येत्या काही दिवसांत सेवानिवृत्त होत असलेल्या व सलग याच शाळेत ३४ वर्षे सेवा देणारया कैसर बाजी यांचा सत्कार आ रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. पुढे बोलताना आ रोहित पवार म्हणाले की या उर्दू शाळेला १२१ वर्षाचा इतिहास आहे. या शाळेतून ऐकेकाळी हिंदू मुस्लीम समाजाचे लोक एकत्र शिक्षण घेत होते. या शाळेतील विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. या ऐतिहासिक शाळेची आत्याधुनिक शैक्षणिक साहित्य सुविधांसह मोठी इमारत उभी करण्यास आपण प्रयत्न करणार आहे.
साफ्टवेअर काँम्पुटरचे कोडींग शिक्षण कंपनीचे लोक येऊन शिकवणार आहेत. मुलांचा शाळेत जास्त वेळ जातो तो कारणी लागण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेतील मूलांना आमदार रोहित पवार यांच्यावतीने एक भेट वस्तू देण्यात येणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, उर्दू शाळेतील शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
