जामखेड न्युज——

राज्यात सत्ता बदल झाला. विरोधी बाकावर बसलेला भाजप पक्ष सत्तेत आला. त्यातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. ज्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपमधील ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा देखील समावेश होता. मात्र त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाले होते. ज्यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. या पदासाठी शेवटच्या टप्प्यात बावनकुळे व प्रा. राम शिंदे ही नावे चर्चेत होती. शेवटी बावनकुळे यांची निवड झाल्याने आता मंत्रीमंडळ विस्तारात प्रा. राम शिंदे यांची वर्णी लागणार? अशी चर्चा कर्जत जामखेड मतदारसंघात आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्षपद बावनकुळे यांना देण्यात आले आहे. तर आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे.ते पक्षाचे अनुभवी नेते आहेत त्यामुळेच त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विदर्भात चांगलाच प्रभाव आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे पाठबळ आहे. तसेच त्यांच्यामुळे भाजपला एक ओबीसी चेहरा मिळाला आहे ज्याचा फायदा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो.

बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री असाताना 2014 ते 2017 दरम्यान त्यांनी राज्याच्या उर्जामंत्री पदाची धुरा देखील सांभाळली आहे. मात्र असे असूनही 2019 मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. तरी देखील नाराजी धरून न ठेवता त्यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले.

त्यामुळे त्यांची हीच एकनिष्ठता त्यांच्या कामी आली आहे, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. बावनकुळे यांच्यात संघटन कौशल्ये असल्याने पक्ष बांधणीसाठी ते चांगले काम करू शकतात, असा विश्वास पक्षश्रेष्ठीना आहे, त्यामुळेच त्यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

प्रा. राम शिंदे यांचा चित्तथरारक राजकीय प्रवास
मौजे चौंडी गावचे सरपंच ते पंचायत समितीचे सभापती ते दोन वेळा आमदार मुख्यमंत्री देंवद्रजी फडवणीस यांच्या मंत्री मंडळात सुरुवातीला राज्यमंत्री नंतर चांगले काम केल्यामुळे कॅबिनेट मंत्री म्हणून एकूण १४ वेगवेगळ्या खात्याचे काम सांभाळली.
पाच वर्षात मंत्री म्हणून कुठल्याही वादात अथवा त्यांच्यामुळे पक्ष अडचणीत आला नव्हता. या सर्व जमेच्या बाबींसह आभ्यासु, आक्रमक वक्तृत्व आणि राज्यभर संबंध असलेले शिवाय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे माहेरकडील नववे वंशज
एका सामान्य शेतकरी घरी जन्म झालेले सालगड्याचा मुलगा संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपुर्ण धनगर समाज एकत्र मौजे चोंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जंयतीला आणुन समाजाला योग्य दिशा देणारे.
स्वर्गीय लोकनेते गोपींनाथराव मुंडे यांच्या तालमित वाढलेले मुख्यमंत्री देंवद्र फडवणीस यांचे विश्वासू प्रा.रामजी शिंदे यांना पुढील विस्तारात नक्कीच मंत्री पदाची शपथ घेणार असा विश्वास कर्जत जामखेड मतदारसंघातील लोकांना आहे.





