जामखेड न्युज——

आपल्या अंगभूत कला गुणांची क्षमता सिद्ध करण्यासाठी अशा स्पर्धा हे एक चांगले माध्यम आहे. तसेच स्वातंत्र्य महोत्सव हा राष्ट्रीय सण आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी यात हिरिरीने सहभागी व्हावे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड बोलत होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ल. ना. होशिंग विद्यालयात चित्रकला, रांगोळी, निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग, दत्तात्रय काळे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसुळ, अनिल देडे, मुकुंद राऊत, त्रिंबक लोळगे, राजकुमार थोरलसं, अर्जुन रासकर, गिता दराडे, सुप्रिया घायतडक, अविनाश ढेरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ल. ना. होशिंग विद्यालयात एपीजे अब्दुल कलाम सभागृहात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी. तिरंगा ध्वज, स्वातंत्र्याची ७५ वर्षे, देशभक्तांची तसेच महापुरुषांच्या रांगोळी काढण्यात आली.

जामखेड पंचायत समिती मार्फत बालचित्रकला स्पर्धा चार गटात घेण्यात आली यावेळी तालुक्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्फुर्तपणे सहभाग नोंदविला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुकुंद राऊत, संगिता दराडे, त्रिंबक लोळगे, रविंद्र कोरे सह सर्व कला शिक्षकांनी परिश्रम घेतले.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचे देशप्रेम जागृत व्हावे म्हणून निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.





