हर घर तिरंगा साठी जामखेड प्रशासन सज्ज- तहसीलदार योगेश चंद्रे तालुक्यात तीस हजार घरांवर तिरंगा ध्वज फडकणार

0
416
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज——
देश भरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आसल्याने सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. हर घर तिरंगा हा कार्यक्रम सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायचा आहे . यासाठी जामखेड प्रशासन सज्ज आहे तालुक्यातील तीस हजार घरांवर तिरंगा फडकवण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी प्रचार रॅली दरम्यान केले. 
यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने हर घर तिरंगा या संकल्पनेतून जामखेड तहसील कार्यालय, जामखेड नगर परिषद, तसेच सर्व विभागाचे प्रशासकीय प्रमुख, सतरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी अहमदनगर, ल. ना होशिंग विद्यालय, कन्या विद्यालय, श्री नागेश विद्यालय, व जामखेड महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने
जामखेड शहरात आज दि १२ रोजी सकाळी प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड नगरपरिषदेने तिरंगा रथाची  सजावट केलेली होती. रॅलीचे मुख्य आकर्षण १५० एनसीसी कॅडेट ने अतिशय थाटामाटा तिरंगा ध्वजाचे संचलन संपूर्ण जामखेड शहरातून करण्यात आले. यावेळी संपूर्ण जामखेड शहर भारत माता की जय, हर घर तिरंगा, देश की शान तिरंगा, हमारी जान तिरंगा , वंदे मातरम या घोषणेने दुमदुमून निघाले.     
या वेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ . युवराज खराडे, ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, एन सी सी अॉफीसर मयुर भोसले सर, गौतम केळकर, अनिल देडे सर, नगरपरिषदचे कर्मचारी प्रमोद टेकाळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
या वेळी जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी बोलताना सांगितले की दि १३, १४, व १५ या तीन दिवसा मध्ये आपला राष्ट्रध्वज तिरंगा प्रत्येकाने आपल्या घरावरती उभा करायचा आहे. या नंतर तिसर्‍या दिवशी १५ तारखेला संध्याकाळी हा राष्ट्रध्वज सन्मानाने उतरावयाचा आहे. या राष्ट्रध्वजाचा आपमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आसे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. 
या नंतर जामखेड शहरातुन प्रचार रॅली काढण्यात आली ही रॅली जुना कोर्ट रोड, मेन पेठ, संविधान चौक, खर्डा रोड, जयहिंद चौक, बीड कॉर्नर मार्गे जामखेड तहसील कार्यालयासमोर येऊन सदर रॅलीची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here