आमदार रोहित पवारांच्या हस्ते साकत येथे विविध कामांचा लोकार्पण सोहळा, हरघर तिरंगा कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न अंगणवाडी सेविकांनी आमदार रोहित पवारांना बांधली राखी

0
234
जामखेड न्युज—–
   कर्जत-जामखेडचे कार्यकुशल आमदार विकास पुरुष रोहित पवारांच्या हस्ते साकत येथे विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच घर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अंगणवाडी सेविकांनी आमदार रोहित पवारांना राखी बांधण्यात आली यावेळी रोहित पवारांनी शेतकरी, शेतमजूर, अंगणवाडी सेविका यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. 
     साकत येथे २५/१५ अंतर्गत पाच लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रीटीकरण पेव्हिंग ब्लॉक बसवणे , विठ्ठल मंदिर परिसरात काँक्रीटीकरण तीस लक्ष रूपये, दलित वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण पेव्हिंग ब्लॉक बसवणे २५ लक्ष रूपये, दलित वस्ती आरओ प्लान्ट लोकार्पण सात लक्ष रूपये, स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा निर्मुलन वीस लक्ष रूपये अशा विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले. 
   यावेळी घर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत आरोग्य उपकेंद्रात  
   वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविकांनी आमदार रोहित पवारांना राखी बांधली यावेळी आमदार पवारांनी सांगितले की, शेतकरी, शेतमजूर याबरोबरच अशा सेविकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सांगितले. 
     यावेळी आमदार रोहित पवार, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट सर, सुर्यकांत मोरे, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजू वराट, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर, गणेश वराट, युवराज वराट, रामहरी वराट, मनिषा वराट, मनिषा सानप, मीराबाई वराट, छाया वराट, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
   यावेळी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, परिसरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन होते या वर्षी सोयाबीन पीकांवर गोगलगायचा प्रादुर्भाव झालेला आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य औषधोपचार करावा याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. योग्य औषधोपचार केल्यास गोगलगायचा बंदोबस्त करता येतो असेही सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here