खाडे महाराज मारहाण प्रकरणी वीस तोळे सोने हस्तगत महाराज अद्यापही फरारच राज्याबाहेरील भक्तांनी लपवले असलेल्याची चर्चा

0
285
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज——
   गेल्या आठ दिवसांपासून खाडे महाराज मारहाण व लैंगिक अत्याचार प्रकरणी महाराजांवर गुन्हा दाखल या परस्पर विरोधी फिर्यादी मुळे बीड सह नगर जिल्ह्यात वातावरण एकदम ढवळून निघाले आहे. खर्डा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. महाराजांना मारहाण प्रकरणी दोन आरोपींना अटक करत वीस तोळे सोने हस्तगत केले आहे. महाराजांचा शोध सुरू आहे. महाराज दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात भक्तांच्या आश्रयाला असावेत असा अंदाज आहे. 
पाटोदा, जिल्हा बीड तालुक्यातील,  हनुमानगड सावरगाव येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांना जामखेड तालुक्यातील मोहरी येथे एका मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरोधात जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना खर्डा पोलीसांकडून दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडील सदर गुन्ह्यात चोरी गेलेले २० तोळे सोने हस्तगत करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
      पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा तपास करून बाजीराव गिते व अरूण गिते यांना ३ आँगस्ट रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी तपास करून आरोपीकडून २० तोळे सोने हस्तगत केले आहे. सोमवारी पोलीस कोठडी संपत असल्याने पोलीसांनी सदर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता आणखी तपासासाठी व इतर तीन आरोपींना अटक करायची असल्याने आरोपींना कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलीसांनी केली असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. 
बुवासाहेब खाडे आठ दिवसांपासून फरार आहेत
  दरम्यान हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्यावर जामखेड तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असल्याने बुवासाहेब खाडे आठ दिवसांपासून फरार आहेत. जामखेड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत नगर येथे एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले गुन्हा दाखल होताच तेथुन फरार झाले. सध्या ते दुसऱ्या राज्यात असावेत असा अंदाज आहे. पोलीस प्रत्येक भक्तचा कसून शोध घेत तपास करत आहेत. 
   मागे काही वर्षांपूर्वी महाराजांविषयी एक अश्लील आॅडिओ क्लीप व्हायरल झाली होती त्यावेळी परिसरात खुपच चर्चा झाली होती. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महारजांचे भक्त गण आहेत अनेक ठिकाणी महाराज यांची जंगी हत्ती वरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सध्या एखाद्या भक्तांच्या आश्रयाला असावेत असा अंदाज आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here