जामखेड नगरपरिषदे मार्फत हर घर झेंडा बाबत जाहीर आवाहन

0
188
जामखेड न्युज——
जामखेड शहरातील सर्व नागरिक बंधू-भगिनींना आवाहन करण्यात येते की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्ती विषयी जाज्वल्य भावना कायमस्वरूपी  मनात रहावी या उद्देशाने देशात सर्वत्र ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे.
या अंतर्गत दिनांक 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय/ खाजगी आस्थापना/सहकारी संस्था/ शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी.
सदर ध्वज दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी आपापल्या इमारतीवर, घरावर फडकविण्यात यावा व तो दिनांक 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.30 वाजता उतरविण्यात यावा….. शासनामार्फत नगरपरिषदेला ध्वज प्राप्त झालेले आहेत. या ध्वजांची विक्री नगर परिषदे मार्फत वेगवेळ्या ठिकाणी स्टॉल लावून करण्यात येणार आहे. 
तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता समूह राष्ट्रगीताचे गायन होणार आहे.तरी सर्वांनी आपण आहे त्या ठिकाणी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगीताचे गायन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here