अनिकेत कुलकर्णी यिन च्या पहिल्या केंद्रीय शिक्षण समितीवर

0
153
जामखेड न्यूज—–
सोनेगाव तालुका जामखेड येथील युवक अनिकेत कुलकर्णी कुलकर्णी हे सकाळ मध्यम समूहाच्या young inspirator network अर्थात यिन च्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्षी कार्यरत होते. आता त्यांची यिन केंद्रीय शिक्षण समितीवर संघटक म्हणून नियुक्ती झाली आहे.
३१ जुलै रोजी झालेल्या yin conclave 2022 या कार्यक्रमात या समिती आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. 2014 पासून आता पर्यंत यिन मधील प्रमुख माजी पदाधिकारी ह्या समितीवर नेमले आहेत. अनिकेत कुलकर्णी हे यिन मधील सक्रिय पदाधिकारी आहेत.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी,दौरे आणि त्यांच्या कामाच्या शैलीमुळे ते सर्वपरिचित आहे. तालुक्याबरोबरच राज्यामध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सामाजिक संघटना आणि चळवळीत ते अग्रेसर असतात. युवक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. येत्या काळात विद्यार्थी हितासाठी काम करू आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न यिन शिक्षण समितीच्या माध्यमातून करेन असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here