जामखेड न्युज——
शालेय जीवनातील पहिली राज्यस्तरीय शासकीय स्पर्धा परीक्षा म्हणून इ.5वीच्या पूर्वउच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेकडे पाहिले जाते.रविवारी झालेल्या या परीक्षेस प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवार दि.30जुलै 2022 रोजी जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी (धोंडपारगाव) येथे माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे माता सदस्यांनी मंगलमय व पवित्र वातावरणात औक्षण केले.यानंतर स्वतःच्या 69 वर्षे वयाच्या आयुष्यात विविध विषयांवरील शेकडो पुस्तके व ग्रंथांचे चौफेर वाचन केलेल्या श्रीम.जिजाबाई भीमराव कोल्हे यांनी आपण बालपणासून केलेल्या विविध पुस्तकांचे वाचन व त्याचा स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच मुलांवर संस्कार करण्यासाठी झालेला सदुपयोग यावर अनुभवकथन केले. त्यांनी ‘एक दिवसात संपूर्ण पुस्तकाचे वाचन’ हा अभिनव उपक्रम स्वतःच्या जीवनात अंगिकारून आतापर्यंत केलेल्या शेकडो पुस्तकांच्या वाचनाचा प्रेरणादायी अनुभव सांगितला. त्यांनी जपलेली वाचन संस्कृती व त्यांच्यातील ‘वाचनवेड’ पाहून सर्व विद्यार्थ्यांसह माता पालकांनी प्रेरणादायी पुस्तकांचे नियमित वाचन करण्याचा संकल्प केला.

यानंतर कोरोना काळात केलेल्या विशेष सामाजिक कार्याबद्दल तसेच स्वतःचा मुलगा MBBS करण्यासाठी केलेल्या प्रेरणादायी संघर्षाबद्दल मा.सौ.उमाताई संजय कोल्हे(B.Sc.-DMLT) यांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.आदर्श माता असलेल्या सौ.उमाताईंनी स्वतःचा मुलगा मा.श्री.ओम संजय कोल्हे जे सध्या बी.जे.मेडिकल कॉलेज पुणे येथे MBBS च्या तृतीय वर्षाला आहेत, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची गाथा तसेच कोरोना काळात आरोळे हॉस्पिटलमध्ये सेवाभावी काम करतानाचे आलेले विस्मयकारक/दाहक अनुभव ऐकून प्रत्येक मातेच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

यानंतर मा. सौ.लक्ष्मी जाधव मॅडम (MA.B.Ed.) यांनी ‘स्पर्धा परीक्षेचे महत्त्व’ या विषयावर अप्रतिम मार्गदर्शन केले.यावेळी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा 2022 मध्ये गुणवत्ता यादीत समावेश झाल्याबद्दल चि.शंभूराज विकास शिंदे व चि.उत्कर्ष रामेश्वर ढवळे या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या माता पालक मेळाव्यासाठी धोंडपारगावसह राजेवाडी, झिक्री, फुलमाळीवस्ती,बोर्ले व जामखेड येथील मातांची लक्षणीय उपस्थिती होती.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी मा.सौ.राणीताई सुशीलकुमार धुमाळ ,मा.सौ.अर्चनाताई बळीराम शिंदे,मा.सौ.दुर्गाताई सचिन शिंदे,मा.सौ.वर्षाताई संदीप धुमाळ ,मा.सौ.संध्याताई दिपक शिंदे मा.सौ.सोनालीताई किशोर धुमाळ, मा.सौ.अर्चनाताई रामहरी शिंदे, मा.सौ.अंजलीताई विजय जेधे ,मा.सौ.कमलताई सुभाष पवार ,मा.सौ.उज्ज्वलाताई बंडू म्हेत्रे,मा.सौ. सोनालीताई बाळासाहेब येवले,मा.सौ. रेणुकाताई जयहिंद काकडे,मा.सौ.सविताताई रामा लोहार,मा.सौ. शालनताई आप्पासाहेब शिंदे,मा.सौ.सुवर्णाताई आप्पासाहेब साळवे ,मा.सौ. पल्लवीताई अभिमान शिंदे,मा.सौ.स्वातीताई मारूती सराफ ,मा.सौ.स्वातीताई संतोष भांडवलकर,मा.सौ. चंद्रकलाताई बाबासाहेब फुलमाळी ,मा.सौ.राणीताई केशव शिंदे ,मा.सौ.कांचनताई माधव शिंदे,मा.सौ.चंदाराणीताई लक्ष्मण झांजे,मा.सौ.जयाताई अशोक शिंदे, मा.सौ.मनीषाताई चंद्रसेन शिंदे या माता सदस्यांनी तसेच मा.श्रीमती अरूणाताई रमेश औटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर इनामदार सर यांनी उपस्थित सर्व माता सदस्यांचे आभार मानून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध सहशालेय उपक्रमांच्या यशस्वितेसाठी शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.