उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल -जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी जामखेडची संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरे बरोबरच तालुकाप्रमुख संजय काशीद तालुक्यात पंचवीस हजार सदस्य नोंदणी करणार

0
218
जामखेड न्युज——
   राखेतून फिनिक्स पक्षी ज्या प्रमाणे उंच भरारी घेतो त्याप्रमाणे संपुर्ण राज्यात पुन्हा शिवसेना भरारी घेईल व पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी व्यक्त केला
    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जामखेड तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी सर्व शिवसैनिकांनी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असल्याचे शपथपत्र लिहून दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,जामखेड तालुका प्रमुख संजय काशिद, तालुका उपप्रमुख गणेश उगले, शहर प्रमुख गणेश काळे, उपशहर प्रमुख अवि बेलेकर, चंदन अंधारे, विभाग प्रमुख संतोष शिंदे, अल्पसंख्याक प्रमुख नासीर खान, युवा सेना प्रमुख सुहास मदने, जेष्ठ सतिष यादव, शिवाजी केवडे, प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत चव्हाण, कैलास खेत्रे, निलेश वारे, श्रीकांत सिद्देश्वर, श्रीधर सिध्देश्वर, आण्णा दाताळ, अभि चिंचकर, अरुण ढाळे, पांडूरंग शिंदे, जगदिश भाकरे, दिपक सुरसे , विकास साळुंके आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी बोलताना दळवी म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यात आठ दिवस विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. रक्तदन
 शिबीर, फळे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. 
    यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद म्हणाले की, जामखेडची संपूर्ण शिवसेना हि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर आहे. तालुक्यात पंचवीस हजार सदस्य नोंदणी करून आम्ही उद्धव ठाकरे यांना अनमोल असे गिफ्ट देणार आहोत. पुन्हा शिवसेनेचे सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने जामखेड शहरातील ५००० हजार सदस्य नोंदणीचे गिफ्ट दिले जाणार आहे अशी माहिती शिवसेनेचे  तालुका प्रमुख संजय काशिद यांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या उपस्थित दिली. सदस्य नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे असे त्यांनी नमूद केले.
जामखेड शहरातील नगर जामखेड रोड येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  
     उद्धव ठाकरे यांचा बुधवारी (२७ जुलै) वाढदिवस असल्याने वाढदिवसाच्या दिवशी पुष्पगुच्छ किंवा पुष्पहार न देता सदस्य नोंदणी केलेले अर्जांचे गठ्ठे भेट म्हणून द्या असे आवाहन ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले होते.
   या निमित्त निवारा बालगृह येथे मुलांना फळे वाटप करण्यात  आले.
 या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरातुन सदस्य नोंदणीच्या किती अर्जांचे गिफ्ट पक्षप्रमुखांना दिले जाणार आहे या बद्दल विचारले असता, तालुका प्रमुख संजय काशिद यांनी ही माहिती दिली.
          

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here