जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील साकत परिसर पिवळे सोने म्हणजे सोयाबीनचे आगार म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. या वर्षी पाऊस उशीरा झाल्याने पेरणीही उशीरा झाली. पेरलेले सोयाबीन तसेच जमीनीतून वर आलेले मोड गोगलगाय फस्त करत आहे सोयाबीन विरळ दिसत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. कृषी अधिकारी यांनी गोगलगाय नष्ट करण्यासाठी उपाय योजना सुचविलेल्या आहेत.

एकतर उशिरा झालेली पेरणी यातच वन्य प्राणी रानडुक्कर, हरणे यांचा मोठा उपद्रव असतो आता गोगलगाय तर शेतातील सोयाबीनला फुटलेले अंकुर फस्त करत आहे यामुळे सोयाबीन विरळ होत आहे. वन्य प्राणी यांच्या उपद्रवाबरोबरच आता गोगलगाय च्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर गोगलगायीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. नुकतेच जमिनीतून वर आलेल्या सोयाबीन पिकाला गोगलगाय फस्त करीत आहे. यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. गोगलगाय सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची भीती व्यक्त होत आहे.

गोगलगाय ही बहुभक्षी कीड असून, ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे पाने खाऊन अतोनात नुकसान करते. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून ही कीड कोणत्या ना कोणत्या पिकाचे नुकसान करताना आढळून येत आहे.
गोगलगाय किडीला पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व कमी तापमान अर्थात (२० अंश ते ३२ अंश से.) पोषक आहे. तरी शेतकरी बंधूंन वेळीच सतर्क राहून प्रादुर्भावग्रस् भागात या किडीचे नियमित सर्वेक्षण करावे शंखी (स्नेल), तसेच शेंबडी (स्लग) हे प्राणी मालुस्का या वर्गात समाविष्ट केलेले आहेत.
शंखीच्या अंगावर टणक कवच असते, तर शेंबडीच्या अंगावर कवच नसते गोगलगाय सरपटत चालते व चालतान सतत शेंबडासारखा चिकट स्राव सोडते त्यामुळे त्यांना पुढे सरकणे सोपे जाते शेतात हा स्राव चाळल्यावर त्या जागेवर पांढुरका चकाकणारा पट्टा दिसते त्यावरून आपण या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे, हे ओळखू शकतो, असे कृषी शास्त्रज्ञांची म्हणणे आहे.
गोगलगाय पासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना
अलीकडील काही वर्षांत पिवळे सोने म्हणून अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनची (soybean) पेरणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, यंदा या पिकावर गोगलगाय, (snail) पैसा, पानांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तिला हटवण्यासाठी गुळाच्या पाण्यात सुतळी रिकामं पोतं, अथवा गवताचे ढीग बुडवून शेतात जागोजागी अंथरावेत, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांकडून (Agricultural scientist) दिला जात आहे. तसेच मोरा अल्डीहाईड गोळ्या दोन ग्रॅम प्रति एकरी शेतात टाकाव्यात व पैसा भिलीपीड नियंत्रण करण्यासाठी थायमेथामस १२.६ लम्बडासी हलोथ्रीन ९.५/ zc किटकनाशक ०४ मिली पाण्यात १० लीटर पाण्यात पिकावर फवारावे. असे आवाहन कृषी अधिकारी जामखेड यांनी केले आहे.
राजेंद्र सुपेकर कृषी अधिकारी जामखेड