जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
गुरूकुल मंडळ व प्राथमिक शिक्षक समिती जामखेड तालुका अध्यक्ष विजय जाधव यांनी गेली ४ वर्ष एकनिष्ठेने गुरूकुल मंडळाचे प्रमाणिक पणे विचारांच्या माध्यमातून शिक्षकांसाठी शैक्षणिक, समाजासाठी सामाजिक व संघटना तसेच गुरूकुल मंडळासाठी आर्थिक मदतीचा हात देवून नेहमीच सर्व क्षेत्रात अग्रेसर राहिले.

जामखेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात परिचित असणारे विजय जाधव यांची शिक्षक बँकेची उमेद्वारी का? नाकारली याचे कारण समजले नसून अजूनही ते गुलदस्त्यातच आहे.
शिक्षकांची विविध बिले, प्रशासकीय कामे यासाठी सतत त्यांनी पंचायत समिति स्तरावर काम केले. जाधव यांच्या गटातील शिक्षकां मध्ये उमेद्वारी न मिळल्यायाने नाराजी चा सुर आहे.
गुरुकुल मंडळाच्या विचाराशी सदैव राहणार तसेच येत्या बँकेच्या निवडणूकीत गुरुकुल मंडळाला विजयाच्या समीप नेण्या चे सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ठामपणे या वेळी बोलताना जाधव यांनी सांगितले.
चौकट
नवीन होतकरू शिक्षकांना या पदासाठी संधी मिळावी. यासाठी राजीनामा देत आहे.
मा. विजय जाधव









