Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने प्रा. मधुकर राळेभात यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने प्रा. मधुकर राळेभात यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान

0
269
जामखेड न्युज——
  कबड्डी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारा कृतज्ञता पुरस्कार अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. मधुकर आबा राळेभात यांना अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थित मा. खासदार सुनीलजी तटकरे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
    कृतज्ञता पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारी वृंद, पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे,
जामखेड महाविद्यालय जामखेडचे प्राचार्य डॉ. सुनील नरके,  माजी सभापती संजय वराट, नगरसेवक दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव, जामखेड मिडिया क्लबचे सर्व पदाधिकारी यांच्या सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. 
  
15 जुलै रोजी बालेवाडी पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुला मध्ये क्रीडा क्षेत्रातील कबड्डी या खेळासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे वतीने देण्यात येणारा कृतज्ञता पुरस्कार अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांना ना. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थित माननीय
खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या वेळी माननीय बाबुरावजी चांदेरे , आस्वाद पाटील , शकुंतला खटावकर व महाराष्ट्रातील कबड्डी प्रेमी व सर्व खेळाडू उपस्थित होते. 
  प्रा. मधुकर राळेभात हे अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे आहेत तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित पवार हे आहेत.   कबड्डीचे पितामह बुआ साळवी यांचा जन्म दिवस कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी पुरस्कार देण्यात येतो. 
  
   पुरस्कार तीन विभागात असतो यात बाल कबड्डीचे राज्यातील तीन खेळाडू निवडून त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख देण्यात येतात. तीन आदर्श युवा खेळाडू निवडले जातात त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळतात. तर
सिनीयर आदर्श तीन कबड्डी खेळाडू निवडून त्यांनापंचवीस हजार रुपये रोख बक्षिसे दिले जाते. 
   युवकांचा नगर जिल्हा संघ महाराष्ट्रात प्रथम आला तसेच
नगरचे तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात  निवड झाली आहे. यात प्रा. मधुकर राळेभात यांचे योगदान मोठे आहे. म्हणूनच
त्यांना हा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 
बालेवाडी येथे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!