जामखेड न्युज——
युवकाच्या गळ्यातील ताईत पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी नान्नज येथे सुरू असलेल्या रथयात्रेस उपस्थित लावून भक्तीभावे दर्शन घेतले.

मात्र यावेळी त्यांच्या समर्थकांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे तसेच कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात सचिन गायवळ सर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. गायवळ यांच्या चर्चेमुळे इतर इच्छुक उमेदवारांचीही धाकधूक वाढत असल्याचे दिसून येते आहे.

दि. १३ जुलै रोजी नान्नज येथील आषाढी यात्रा मोठ्या उत्साहात भरवण्यात आली होती. त्यासाठी नान्नज परिसरातील अनेक भावी भक्त दर्शनासाठी आले होते. या दरम्यान सचिन प्रा. गायवळ यांनी आपल्या समर्थकांना फोन वरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नान्नज येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पावसाची रिमझिम सुरू असतानाही मोठ्या प्रमाणात संख्येने कार्यकर्ते नान्नज येथे जमा झाले. त्यानंतर सर्वांनी रथाचे दर्शन घेऊन व मानाच्या रथ ओढून मोठ्या श्रध्देने दर्शन घेतले यावेळी मोठे भक्तिमय वातावरणात तयार झाले होते.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी प्रा. सचिन गायवळ आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र यावेळी सचिन सर गायवळ म्हणाले की आज आपण नान्नज येथे धार्मिक कामासाठी व दर्शन घेण्यासाठी जमलो आहोत. आज फक्त देवदर्शनासाठी एकत्र आलो आहोत. पुढील काळात राजकीय भूमिका सर्वांबरोबर चर्चा करून सर्व कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून निर्णय घेऊ असे सांगितले. परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रा. सचिन गायवळ यांना आगामी जिल्हा परिषद साठी भावी उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी गळ घातली त्यामुळे पुढील काळात प्रा. सचिन सर हे खर्डा जिल्हा परिषद गटाचे भावी उमेदवार होण्याची शक्यता या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेस पहावयास मिळाली ही मात्र निश्चित आहे.