जामखेड न्युज——
जामखेड तालुका मिडिया क्लबच्या पदाधिकार्याच्या निवडी आज खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध संपन्न झाल्या या सर्व पदाधिकार्याचा सत्कार जामखेड तालुका मनसेच्या वतीने मनसेच्या कार्यालयात संपन्न झाला.

यावेळी मनसेचे नेते दादासाहेब ( हवाशेठ) सरनोबत, तालुकाध्यक्ष प्रदीप टाफरे, सनी सदाफुले, कुसडगावचे माजी सरपंच बापुसाहेब कार्ले, आकाश साठे, यश ड्रायव्हींग स्कूलचे संचालक संभाजी वतीने, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत, सहसचिव पप्पूभाई सय्यद, संपर्क व प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, अविनाश बोधले, किरण रेडे, अजय अवसरे , राजकुमार थोरवे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी हवाशेठ सरनोबत, प्रदीप टाफरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत होते.अविनाश बोधले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार पप्पूभाई सय्यद यांनी मानले