जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
नगर जिल्ह्यातील दहा ग्रामसेवकावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामात अनियमितता ,हलगर्जीपणा यामुळे निलंबन तसेच वेतनवाढ रोखण्यात आली आहे यामुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

जामखेड तालुक्यातील हळगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक आ. दा. आखाडे, यांचेवर अनियमितता व गैरहजर प्रकरणी दोन वेतनवादी कायमस्वरुपी बंद. खुरदैठण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक इम्रान शेख यांच्यावर सेवानिलंबनाची कारवाई करण्यात आल्याने ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील एकुण १० ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारयांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना विविध प्रकारच्या गंभीर शिक्षा केल्या आहेत.

यामध्ये शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव ग्रामपंचायतचे तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, आर. बी. काळे गैरवर्तनाबद्दल बडतर्फ, कर्जत तालुक्यातील वडगाव तानपुरा ग्रामपंचायतचेमतत्कालिन ग्रामविकास अधिकारी र. गु. शेलार, यांना गैरवर्तनाबाबत सक्तिची सेवानिवृत्ती, पाथर्डी तालुक्यातील मिरी ग्रामपंचायतचे तत्कालिन ग्रामविकास अधिकारी ज्ञा. गो. सोनवणे, यांचेवर गैरवर्तनाबाबत ४ वेतनवाढी कायमस्वरूपी बंद, जामखेड तालुक्यातील हळगावचे तत्कालीन ग्रामसेवक आ. दा आखाडे, राहाता तालुक्यातील लोणी खु. ग्रामपंचायत तत्कालिन ग्रामविकास अधिकारी शि. दु. सुपे, गैरवर्तन प्रकरणी २ वेतनवाढी कायमस्वरूपी बंद. राहुरी तालुक्यातील बोधेगाव ग्रामपंचायतचे तत्कालिन ग्रामसेवक, आर. व्ही. बोर्ड, ,ता. राहुरी गैरवर्तनाबाबत प्रकरणी एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद केली आहे. नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा ग्रामपंचायतचे तत्कालिन ग्रामविकास अधिकारी ब. तु. शेटवाड, यांना गैरवर्तनाबाबत एक वेतनवाढ तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच सेवानिलंबित कारवाई झालेले ग्रामसेवक इम्रान शेख, ग्रामसेवक, ग्रामपंचायत खुरदैठण, जामखेड पाक्षिक / मासिक समाना गैरहजर, विविध योजना राबविणेकामी दुर्लक्ष, महादेव मल्हारी ढाकणे, तत्कालिन ग्रामसेवक, दिघी, ता. नेवासा १४ वा वित्त आयोग आर्थिक अनियमितता, श. यु. पठाण, तत्कालिन ग्रामसेवक, ग्रामपंचायत काळेगाव, ता. शेवगाव गैरवर्तन व संशयित अपहार गटविकास अधिकारी पं.स. शेवगाव यांनी दि. २४/६/२०२२ रोजी गुन्हा दाखल केलेला आहे.
जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारयांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना गंभीर शिक्षा केल्या आहेत. तसेच तीन ग्रामसेवक यांना सेवा निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जामखेड तालुक्यातील आणखी काही ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









