जामखेड न्युज——
शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे. सर्वांनी ती व्यक्तही केली आहे. पण उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूला असणारे लोक दिशाभूल करत आहेत. तोंडघशी पडण्याचा प्रकार का करत आहात? शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे हे स्वीकारलं पाहिजे असा सल्ला एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

“अशी कोर्टबाजी करण्यात काही अर्थ नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण कुठेतरी आडवायचं यासाठी सुरु आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा खराब होत आहे,” असंही ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत. यावेळी अरविंद सावंत यांनी अपात्रतेसंदर्भातील याचिका प्रलंबित असताना शपथ कशी काय दिली? असा प्रश्न विचारला आहे. कोणता पक्ष म्हणून त्यांना बोलावण्यात आलं होतं असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.









