जामखेड तालुका शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरेंच्या पाठिशी – संजय काशिद

0
313
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – 
   सध्या राज्यात उद्भवलेल्या अद्भुत राजकीय परिस्थितीमधे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे सह शिवसेना मोठ्या संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत संपुर्ण जामखेड तालुका शिवसेना पक्ष पुर्णपणे ताकदनिशी शिवसेना संघटनेबरोबर व पक्षाबरोबर असल्याची माहिती तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी दिली.
                     ADVERTISEMENT
      शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी व शिवसेना कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्यात शिवसेनेची घोडदौड चांगली सुरू आहे आज जामखेड संपुर्ण जामखेड तालुका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभा आहे असे सांगितले.
                           ADVERTISEMENT
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ( आप्पा) वाळुंजकर, गणेश उगले, नागराज जंगम, युवा सेना तालुकाप्रमुख सावता हजारे, शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे, उपशहरप्रमुख अवी बेलेकर, चंदन अंधारे, युवा सेना शहरप्रमुख सुरज काळे, खर्डा गट युवा सेना सुहास मदने, पांडुरंग शिंदे गट प्रमुख जवळा, संतोष शिंदे साकत गट प्रमुख, निलेश गायकवाड जातेगाव गण प्रमुख, महिला आघाडीच्या प्रमुख मीराताई तंटक, सावता मोहळकर, महेंद्र काळे गण प्रमुख नान्नज यांच्या सह अनेक शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
   शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद जामखेड न्युजशी बोलताना म्हणाले की, शिवसेना पक्ष हा आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून मा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभा आहे. त्यांच्या बरोबर सर्व शिवसैनिक आहेत. त्यामुळे पक्षप्रमुखांनी कसलीही काळजी करू नये शिवसेनेला अशी संकटे नवीन नाहीत अशी अनेक संकटे शिवसेनेने पचवलेली आहेत याही संकटातून पक्ष नव्या जोमाने पुन्हा उभारी घेईल असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here