आमदार प्रा. राम शिंदे यांची जामखेड शहरात भव्य दिव्य विजयी मिरवणूक मशिनने गुलालाची उधळण क्रेनच्या साहाय्याने घातला हार

0
277
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – – 
  विधानपरिषदेवर आमदार होण्याची प्रा. राम शिंदे यांना संधी मिळाल्याने कोमात गेलेले भाजपा कार्यकर्ते चांगलेच जोमात आले. आज सकाळी कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी मिरवणूक व सत्कार आयोजित करण्यात आला होता सायंकाळी जामखेड शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती विश्रामगृहापासून ते बीड रोड पर्यत भाजपाचे झेंडे अनेक ठिकाणी कमानी दिल्या होत्या दोन डिजे, प्रसिद्ध ढोल पथक तसेच गुलाल उधळण्याचे मशिन तसेच खर्डा चौकात क्रेनच्या साहाय्याने हार घालण्यात आला मिरवणूकीच्या वेळी पावसाने देखील आमदार प्रा.. राम शिंदे यांचे स्वागत केले. 
                        ADVERTISEMENT
 
 कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांचा पराभव केला होता. तेव्हापासून राम शिंदे यांना रोहित पवार यांच्या विरोधात ताकद मिळावी यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून शिंदेना विधानपरिषदेचे आमदार करण्याची मागणी होत होती. अखेर अडिच वर्षांनंतर राम शिंदे हे आज पुन्हा आमदार झाल्याने कर्जत व जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ( 
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विधानपरिषदेच्या पाच जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपने पाचच उमेदवार दिले होते. ते सर्व उमेदवार विजयी झाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील जागांच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजपचे नेते व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला होता.
   जामखेड शहरात तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते मिरवणूकीत सहभागी झाले होते रिमझिम पावसात भिजत गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गेली अडीच वर्षे भाजपा कार्यकर्ते कोमात असलेले कार्यकर्ते मोठय़ा जोमात दिसत होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here