जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील राजू भोसले या शेतकरी कुटुंबातील सुरज वय 28 वर्षे हा जन्मापासूनच मतिमंद होता तसेच त्याचे हात व पायाची अवस्था ही दिव्यांग असल्याने या मुलाचा विवाह होईल की नाही अशी संभ्रमावस्था त्याच्या कुटुंबीयांना होती.

या मुलाच्या विवाहाचा योग जुळून आला भांडगाव तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथील मुकुंद अंधारे यांची मुलगी प्रांजली मुकुंद अंधारे इ. बारावी शिकलेली व एका पायाने अपंग असलेले सुंदर मुलगी तिच्याशी विवाह करण्याचा योग जुळवून आणण्याचे काम येथील घनश्याम भोसले व भांडगाव येथील सचिन अंधारे या तरुणांनी सामाजिक भान राखत दोन्ही कुटुंबीयांना विषयी असणारे आस्था या सर्व घडामोडीत त्यांनी मोलाचे प्रयत्न करून या दोन्ही अपंगाचा विवाह जुळविला.
या अपंग तरुण तरुणीचा एक आगळा वेगळा आदर्श विवाह खर्डा येथील सिताराम गडावर नुकताच पार पडला गडाचे मठाधिपती ह.भ.प. महालिंग महाराज नगरे व ह.भ.प. वायसे महाराज यांच्या उपस्थितीत व त्यांच्या आशीर्वादाने विवाह सोहळा संपन्न झाला.
सुरज भोसले हा मतिमंद व अपंग असला तरी तो स्वतःच्या पेविंग ब्लॉगच्या कारखान्यात आपल्या वडिलांना कामात मदत करून आई-वडिलांना मदतीचा हात आजही देत आहे.
तसे पाहिले तर समाजात आज मुलांच्या लग्नाचा विवाह जुळण्याचे प्रमाण कमी होत चालले असून त्यामुळे विवाहाचा गुंता वाढताना दिसत आहे अनेक तरुणांनी चाळीशी गाठली आहे परंतु सध्याच्या काळात अजूनही असंख्य तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत आहे परंतु या दोन्ही अपंगाचे दोनाचे चार हात झाल्याने दोन्ही कुटुंब आनंदात असून खर्डा शहरात एक आदर्श विवाह झाल्याने सर्वजण याचेच कौतुक करीत आहेत.









