मोटार वाहन निरीक्षकांचा जून महिन्याचा दौरा कार्यक्रम

0
192
जामखेड न्युज – – – 
 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांचा जून, २०२२ चा मासिक दौरा कार्यक्‌रम जाहीर झाला आहे‌.  काष्टी -14 जून, जामखेड-15 जून, पाथर्डी -16 जून, पारनेर-17 जून,  श्रीगोंदा-19 जून,  शेवगाव-22 जून,  आणि चौंडी -23 जून असा दौरा आहे.
            प्रत्येक तालुक्यात मासिक दौ-याचा दिवस जाहीर दिनांकाप्रमणे आहे‌. ज्या दिनांकाचे दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल किंवा शासकीय सुट्टी जाहीर होईल तसेच प्रशासकीय कारणास्तव दौरा रह झाल्यास त्या दिवसाच्या मासिक दौऱ्याचे कामकाज दुसऱ्या सोईस्कर दिवशी होईल व त्याची तारीख त्यावेळी जाहीर करण्यात येईल. अर्जदारांची अपूर्ण कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्विकारली जाणार नाहीत. कॅम्पचे सर्व कामकाजाबाबत शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे बंधनकारक राहील. दौऱ्याच्या ठिकाणी परराज्यातून आलेली वाहने (RMA) तसेच बसेस तपासणी केली जाणार नाहीत. ज्या तालुक्यात कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. त्या तालुक्यातील नागरिकांचे कॅम्पमध्ये कामकाज करण्यात येईल. शिबीर कामकाज ठिकाणी तपासणी होणाऱ्या सर्व नवीन तात्पुरती नोंदणी झालेल्या परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांचे डिस्क्लेमर असल्याशिवाय वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.असे अहमदनगरचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here