नगरपरिषद, नगरपंचायत आरक्षणाची १३ जूनला सोडत

0
183
जामखेड न्युज – – – – – 
राज्यभरातील २१६नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ जून २०२२ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी दिली. आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या २१६ मध्ये २०८ नगरपरिषदा आणि ८ नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल.
आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी आज( १० जून) नोटीस प्रसिद्ध करतील. १३ जून २०२२ रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या १५ ते २१ जून २०२२या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
सोडतीनंतर निवडणुकीची तयारी सुरु –
या नगरपरषिदांतील अनेक इच्छुक उमेदवारांनी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरु केले आहेत. त्या त्या प्रभागात त्यांनी काम करण्यासही सुरुवात केली आहे. आता सोडतीनंतर नेमके कुठले आरक्षण पडते की वॉ़र्ड ओपनमध्ये पडतो, याकडे अनेकांचे लक्ष असेल. त्यामुळे सोडतींचे चि६ स्पष्ट झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here