बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी नर्सचा तलावात आढळला मृतदेह, आत्महत्या की हत्या?

0
229
जामखेड न्युज – – – – 
अवैध गर्भपात प्रकरणात (Beed illegal abortion case) आरोपी असलेल्या नर्स महिलेचा मृतदेह (nurse dead body found in lake) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नर्सचा खून की आत्महत्या (suicide) याबाबत संशय व्यक्त केला जातोय. बीड तालुक्यातील पालीच्या बिंदुसरा तलवात आरोपी नर्सचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे . सीमा सुरेश डोंगरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सीमा सिस्टर नावाच्या महिलेवर अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. पण आज पहाटे सदर महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिचा पाली येथील तलावात सकाळी मृतदेह आढळला. ती बीडच्या डीपीरोड भागातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी ती नर्सचे काम करत होती.
सीमा डोंगरे यांच्यावर आज सकाळीच गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी काल या प्रकरणी एका एजंट महिलेला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतचा एफआयआर दाखल झाला. त्यानंतर सीमा डोंगरे यांचा तलावात मृतदेह आढळला. सीमा यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भपाताच्या रॅकेटवर पडदा टाकण्यासाठी तर हे घडवून आणलं गेलं नाही ना? असा संशय व्यक्त केला जातोय. याशिवाय या प्रकरणातून जी मोठी नावं समोर येऊ शकतात ती नावं समोर येऊ म्हणून अशा प्रकारचा घातपात घडवून आणण्यात आलाय का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पण सीमा यांच्या आत्महत्येमुळे पोलिसांपुढील आव्हानं वाढली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here