Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना नोकरी मिळणार नाही, इंदुरीकर महाराजांचे...

कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना नोकरी मिळणार नाही, इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

0
307
जामखेड न्युज – – – – 
इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) आणि वादग्रस्त वक्तव्य हे प्रकरण राज्यातील नागरिकांना नवं नाही. कधी महिलांविषयी, तर कधी राजकारणाविषयी तर कधी कीर्तन देत असूनही त्यांनी वारकरी पंथाविषयीही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. तर नुकताच इंदुरीकर महाराज यांनी जळगावमध्ये (Jalgaon Kirtan) आता ऑनलाईन शिक्षणाविषयी (Online Education) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कीर्तन चालू असताना ते म्हणाले की, कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले आहेत त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही असं धक्कादायक विधान त्यांनी जळगावमध्ये केले आहे. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
जळगावमध्ये बोलताना त्यांनी ऑनलाईन शिक्षणाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांनी नोकरीविषयीही बोलताना सांगितले की, आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. जो कष्ट करतो त्याला पगार कमी, आणि बुद्धी चेक करुन पगार दिला पाहिजे असंही त्यांनी म्हटले आहे.
अध्यात्म द्या पुढची पिढी घडेल
तसेच सर्व वारकरी एकत्र आले तर देश बदलू शकतात, विज्ञाना बरोबर अध्यात्म द्या पुढची पिढी घडेल अशा विविध विषयांवर त्यांनी आपल्या किर्तनातून मुद्दे मांडले. या किर्तनामध्ये त्यांनी पोलिसांच्या कार्याविषयीही गौरवोद्गगार काढले. कोरोना काळात खरं काम कुणी केलं असेल तर पोलीस खात्याने काम केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले कोरोना काळातील खरे योद्धे हे आपले पोलीसच होते, असंही त्यांनी सांगितले.
अनेक देशांची आर्थिक परिस्थिती कोलमडली
कोरोना महामारीनंतर जागतिक पातळीवर संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. अनेक देशांची आर्थिक परिस्थिती कोलमडली असून आजही अनेक देश आर्थिक संकटातून जात आहेत. कोरोनामुळे ज्याप्रकारे आर्थिक परिस्थिती बदलली आहे, त्याच प्रमाणे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिस्थितीही बदलली आहे. अशी परिस्थिती असतानाही भारतात आणि इतर देशात ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू ठेवण्यात आली.
वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका
त्यामुळे परिस्थिती हातळताना विद्यार्थ्ंयांचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रत्येक देशाने घेतली आहे मात्र इंदुरीकर महाराजांनी जळगावमध्ये सांगितले आहे की, कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले आहे त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!